थर्टी फर्स्ट'ला नशेत गाडी चालवणं पडणार महागात; RTO नवे नियम लागू

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या सेलिब्रेशनदरम्यान वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्यांवर आता थेट कारवाई होणार आहे. थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य अपघात टाळण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने विशेष उपाययोजना राबवल्या आहेत. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी शहरात सहा विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.


या मोहिमेअंतर्गत मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवताना आढळलेल्या चालकांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता थेट वाहनचालक परवाना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. शहरातील प्रमुख चौक, महामार्ग तसेच शहराबाहेरील ढाबे, हॉटेल्स आणि रिसॉर्ट परिसरातील रस्त्यांवर ही पथके ब्रेथ अ‍ॅनालायझर मशिनसह तपासणी करणार आहेत.


नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरतात. मद्याच्या नशेत वेगाने गाडी चालवल्यामुळे दरवर्षी गंभीर अपघातांच्या घटना घडतात. हे प्रकार रोखण्यासाठी आरटीओची पथके रात्रभर गस्त घालणार आहेत. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सांगितले की, रस्ते सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असून नियम मोडणाऱ्यांविरोधात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.


दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जुन्या मुंबई–पुणे महामार्गावरील आकुर्डी परिसरात सापळा रचून अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन आलिशान कारमधून सुरू असलेली गांजाची तस्करी उघडकीस आणली. या कारवाईत तब्बल ५५ किलो ५७५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत ४२ लाख रुपये आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

Comments
Add Comment

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि