हरियाणा : नुकतेच पार पडलेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत (Haryana Assembly Election) भाजपा (BJP) पक्षाने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्रिक मिळवली आहे.
भाजपा नेते नायब सिंह सैनी (Nayab Singh Saini) यांच्या नेतृत्वाखाली हरियाणामध्ये भाजपा सरकार पुन्हा निवडून आले आहे. त्यामुळे येत्या १७ ऑक्टोबर रोजी भाजप नेते नायब सिंह सैनी हे हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत,अशी माहिती मिळत आहे.