सांगली : सांगलीमधील संजयनगर येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, यानंतर अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या घराची जमावाकडून तोडफोड करण्यात आली आहे. तसेच अत्याचार झालेल्या सार्वजनिक शौचालयाची सुद्धा संतप्त झालेल्या जमावाने तोडफोड केली आहे. ९ वर्षाच्या मुलीवर २८ वर्षीय तरुणाने ब्ल्यू फिल्म दाखवून लैगिंक अत्याचार केला होता. त्यानंतर संजयनगर भागातील नागरिकांचा राग अनावर झाला होता. संजयनगर पोलिसांनी आरोपी तरुणास अटक करत आरोपींवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
संतप्त तरुणींकडून कंडक्टरला चोप
बस कंडक्टरने महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेड काढल्याचा प्रकार घडल्यानंतर संतप्त झालेल्या तरुणींनी कंडक्टरला चोप चांगलाच दिलाय. रत्नागिरीमधील दापोली येथे हा प्रकार घडला आहे. बसमध्ये चढलेल्या दापोली पंचंनदी महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेडछाड केल्यामुळे विद्यार्थिनींनी आक्रमक पवित्रा घेतला. दाभोळमध्ये बस थांबवून कंडक्टरला चोप दिल्यामुळे ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती. कंडक्टरला मारहाण करतानाचा व्हिडिओ आला समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान, कंडक्टरविरोधात दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.