आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक

मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर मारल्या आंदोलकांनी उड्या


मुंबई : आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. धनगर समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी मंत्रालयात जाऊन जोरदार आंदोलन केले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून थेट सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या. दरम्यान पोलिसांनी सुरक्षा जाळीवर उतरून या आंदोलकांना बाहेर काढले आहे. यावेळी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.


धनगर समाजाला आदिवासी समाजाचा दर्जा द्यावा आणि आदिवासींच्या कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून धनगर समाजाकडून केली जाते आहे. त्यासाठी राज्यभरातील विविध ठिकाणी उपोषणदेखील सुरू आहे. मात्र, राज्य सरकार आपल्या आंदोलनाकडे लक्ष देत नाही, असा आरोप या आंदोलकांकडून करण्यात आला आहे.


दरम्यान, राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करणाऱ्या धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी आज थेट मंत्रालयात पोहोचून आपल्या मागण्याचे निवेदन सरकारला देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरकार आपले निवेदन स्वीकारत नाही, असा आरोप करत त्यांनी मंत्रायलात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी दुसऱ्या मजल्यावरून थेट सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या. यावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर पोलिसांनी या सुरक्षा जाळीवर उतरून आंदोलकांना बाहेर काढलं. यावेळी या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. या आंदोलकांना आता घेण्यात आल्याची माहिती आहे.


धनगर आरक्षणाचा मुद्दा तापत चालला आहे. मंगळवारी आंदोलकांनी मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या घेतल्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाहेर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.


धनगर बांधवांनी वर्षा निवासस्थानासमोर घोषणाबाजी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. सरकारने धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा जीआर तात्काळ काढावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.


वर्षा निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या धनगर बांधवांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे वर्षा निवासस्थानी जाणार आहेत. धनगर आरक्षणाच्या बाबतीत सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला