सिन्नरच्या टोल प्लाझा कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेत प्रवेश

आमदार नितेश राणे यांना न्यायासाठी साकडे


नाशिक : नाशिक सिन्नर येथील टोल प्लाझाच्या सर्व कर्मचारी वर्गाने आमदार नितेश राणे अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेत प्रवेश केला. संघटना सरचिटणीस प्रवीण नलावडे यांनी मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयातुन संघटना कार्यान्वित झाल्याचे पत्र व्यवस्थापनास दिल्यानंतर कामगार संघटना फलकाचे औपचारिक उद्घाटन संघटना उपाध्यक्ष बाळा कसालकर यांच्या हस्ते करण्यात आले.


व्यवस्थापन अधिकारी दीपक वैद्य, नवनाथ केदार यांची भेट घेऊन कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या आणि व्यवस्थापना कडून होणारी कामगारांची पिळवणूक यावर व्यवस्थापणाला निवेदन देण्यात आले. येत्या दहा दिवसात यावर तोडगा काढण्यासाठी व्यवस्थापणास वेळ देण्यात आली आणि कामगारांच्या समस्या न सोडवल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. सदर कार्यक्रमास नाशिक विभागाचे उपचिटणीस दिगंबर गायकवाड श्री योगेश धामणसकर श्री रणजीत पाटील स्थानिक युनिट कमिटी सदस्य श्री राम तांबोळे रोहन मोरे सागर मोजाड स्वप्नील साबळे नितीन ताजनपुरे गणेश झाडे महेश तुंगार आणि कार्यकारणी सदस्य अंकेश गुप्ता हे उपस्थित होते.

Comments
Add Comment

अल्पवयीन मुलींना दारू पाजल्याचा आरोप, अंधेरीतील 'हॉप्स किचन अँड बार'वर गुन्हा दाखल

मुंबई: अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरातील 'हॉप्स किचन अँड बार' या पबच्या व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध

मुलुंड पश्चिम येथील पक्षीगृह बांधण्याच्या निविदेला प्रतिसाद मिळेना...

मुंबई (खास प्रतिनिधी) : नाहूर, मुलुंड पश्चिम येथे मुंबई महापालिकेच्या वतीने पक्षीगृह उभारण्यात येणार असून या

दिवाळीनिमित्त मुंबई विमानतळावर रोषणाईची अनोखी सजावट

मुंबई: दिवाळीच्या पूर्वसंध्येला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आकर्षक पद्धतीने उजळून

राज्यातील ४७ महसूल अधिकाऱ्यांना बढती

मुंबई : दिवाळीच्या पर्वावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील ४७ महसूल

जगातील टॉप १० सर्वात श्रीमंत व्यक्तींची नावे तुम्हाला माहिती आहेत का? या यादीत भारत पिछाडीवर

मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये अनेक उद्योगपतींनी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करत त्यांच्या

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते असरानी यांचे निधन

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध विनोदी कलाकार आणि ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचे आज निधन झाले.