Amit Shah : अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली आज नक्षल प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक

  45

महाराष्ट्रासह आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती


नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, ७ ऑक्टोबर रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे डाव्या विचारसरणीच्या कट्टरवादी कारवायांनी (एलडब्ल्यूई), म्हणजेच नक्षलवादाने प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा, ओदिशा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश, या राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहतील.


नक्षलवादाने प्रभावित राज्यांना विकास सहाय्य प्रदान करण्यात सक्रीय सहभाग असलेले पाच केंद्रीय मंत्री देखील या बैठकीला उपस्थित राहतील. उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि केंद्र, राज्ये आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे (CAPF) वरिष्ठ अधिकारी देखील या चर्चेत सहभागी होतील.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली, मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचा धोका समूळ नष्ट करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. या समस्येशी लढण्यासाठी केंद्र सरकार नक्षलवादग्रस्त राज्य सरकारांना शक्य ती सर्व मदत करत आहे.


यापूर्वी ०६ ऑक्टोबर २०२३ रोजी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नक्षलवादग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी या समस्येचा खात्मा करण्याबाबत सर्वसमावेशक निर्देश दिले होते. मोदी सरकारच्या रणनीतीमुळे, नक्षलवादाने होणाऱ्या हिंसाचारात तो ७२% घट झाली, तर २०१० च्या तुलनेत २०२३ मध्ये या समस्येमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये ८६% घट झाली आहे. नक्षलवाद आज आपली शेवटची लढाई लढत आहे.


२०२४ या वर्षात आतापर्यंत नक्षलवाद्यांच्या सशस्त्र कॅडरचा (शाखा) खात्मा करण्यात सुरक्षा दलांनी अभूतपूर्व यश मिळवले आहे. या वर्षात आतापर्यंत २०२ नक्षलवादी गटांचा खात्मा करण्यात आला असून, २०२४ च्या पहिल्या ९ महिन्यांत ७२३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, तर ८१२ जणांना अटक करण्यात आली. नक्षलवादाने प्रभावित जिल्ह्यांची संख्या कमी होऊन, २०२४ मध्ये ती ३८ वर आली आहे.


केंद्र सरकारने अनेक पावले उचलली असून, यात रस्ते आणि मोबाईल कनेक्टिव्हिटीला चालना देण्यात आली, ज्यामुळे नक्षलवादग्रस्त राज्यांच्या दुर्गम भागात विकास योजना पोहोचल्या. नक्षलवादाने प्रभावित भागात आतापर्यंत १४,४०० किमी लांबीचे रस्ते बांधले गेले असून, जवळजवळ ६००० मोबाईल टॉवर बसवले गेले.

Comments
Add Comment

Donald Trump : "ट्रम्पचा टॅरिफ बॉम्ब! अमेरिकन अर्थव्यवस्थेला थेट फटका" ट्रम्पच्या निर्णयाने कंपन्यांची घबराट

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतातून आयात होणाऱ्या काही वस्तूंवर

सीबीएसईची नववीची परीक्षा आता ‘ओपन बुक’ पद्धतीने

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नववीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची पद्धत बदलण्याचा

एअर इंडियाच्या सेवानिवृत्त वयोमर्यादेत बदल

मुंबई: एअर इंडियाने आपल्या पायलट आणि काही इतर कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय

श्रावण संपताच माशांच्या खरेदीवरून हायवेवर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी

गोरखपूर: श्रावण महिना संपताच मासे खरेदी करण्यासाठी उत्सुक असलेल्या खवय्यांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये एक विचित्र

प्रवाशाला अस्वच्छ सीट दिल्याने इंडिगो एअरलाईन्सला दिड लाखांचा दंड, दिल्ली ग्राहक आयोगाचा निर्णय

नवी दिल्ली: दिल्ली ग्राहक तक्रार निवारण आयोगाने इंडिगो एअरलाइन्सवर सेवेत कमतरता दाखवून प्रवाशाला अस्वच्छ व डाग

मनी लाँड्रिंग प्रकरणात रॉबर्ट वाड्राच्या अडचणी वाढल्या

दोन कंपन्यांमधून ५८ कोटी रुपयांची बेकायदेशीर कमाईचा रॉबर्ट वाड्रा यांच्यावर आरोप नवी दिल्ली: मनी लाँड्रिंग