Mumbai Metro : मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो प्रवाशांसाठी सज्ज! पाहा कसं असेल वेळापत्रक

  212

मुंबई : मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो (Mumbai Metro) ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ चे उद्घाटन ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते झाले. या भुयारी मेट्रोचा आरे-बीकेसी टप्पा प्रवाशांसाठी खुला करण्यात आला असून आज सकाळी ११ वाजता या मार्गावरील सेवा सुरू झाली.


मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) या प्रकल्पात पहिला टप्पा साकारला होता. त्यामुळे मुंबईकरांना ट्रॅफिकमुक्त आणि जलद प्रवासाचा अनुभव मिळाला. मंगळवारपासून ही मेट्रो सेवा सोमवार ते शनिवार दररोज सकाळी ६.३० ते रात्री १०.३०, तर रविवारी सकाळी ८.३० ते रात्री १०.३० पर्यंत चालणार आहे.


आरे-बीकेसी मार्गिकेवर दररोज ९६ फेऱ्या नियोजित केल्या आहेत. प्रत्येक मेट्रो गाडी दर साडेसहा मिनिटांनी सुटणार आहे. या मेट्रोमुळे प्रवाशांना आरे, जेव्हीएलआर, सीप्झ, एमआयडीसी अंधेरी, मरोळ नाका, विमानतळ टी१, सांताक्रुझ, वांद्रे शासकीय वसाहत आणि बीकेसी अशा प्रमुख ठिकाणी सहज पोहोचता येणार आहे. सध्या या मार्गावर प्रवास करताना एक तासापेक्षा अधिक वेळ लागत आहे, परंतु भुयारी मेट्रोमुळे हे अंतर फक्त २२ मिनिटांत पार करता येईल.



तिकीट दर


प्रवाशांसाठी तिकीट दर १० ते ५० रुपयांदरम्यान ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठीही हा प्रवास परवडणारा आहे. दरम्यान मुंबईतील प्रवाशांसाठी ही सेवा महत्त्वाची ठरली असून या प्रकल्पामुळे भविष्यात मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

मुंबईत दीड लाख नागरिकांना दरवर्षी भटक्या श्वानांचा दंश

निर्बीजीकरण करून माेकाट कुत्र्यांना आश्रयस्थानात हलवण्याची मुंबईकरांची मागणी मुंबई : दिल्लीतील भटक्या

कोस्टल रोड आजपासून २४ तास वाहतुकीसाठी खुला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले लोकार्पण मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई अध

बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे; मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ मुंबई : मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — ॲड. राहुल नार्वेकर

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे —  नीलम गोऱ्हे मुंबई : विधानपरिषद

लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मुंबई : काही

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस