छत्रपती संभाजीनगर : दहशतवादी संघटनांशी असलेले लागेबांधे आणि विघातक कृत्यात सहभाग प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) काल रात्री मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे छापेमारी केली. यावेळी देश विरोधी कृत्यात सहभाग असलेल्या ३ जणांना ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्रात काल रात्री एनआयए आणि एटीएसने संयुक्त कारवाई केली. यात छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालना शहरात छापे टाकले. जालना येथील गांधीनगर येथून एकाला, छत्रपती संभाजीनगर शहरातील आझाद चौका जवळून एकजण आणि एन-६ परिसरातून एक अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्व आरोपी देश विघातक कृत्य करण्याच्या तयारीत होते. त्यांचा देश-विघातक कृत्यात सहभाग असल्याचा संशय आहे.
संबंधित आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर तीनही ठिकाणी घटनास्थळाचा पंचनामा सुरू आहे. दरम्यान, देशभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी कारवाई सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे संशयीत जम्मू-कश्मीरमधील जिहादी दहशतवादी संघटनांशी संबंधित आहेत.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…