Accident News : भीषण अपघात! उत्तरप्रदेशात ट्रकच्या धडकेत १० जणांचा मृत्यू

  93

मिर्झापूर : उत्तरप्रदेशच्या (Uttarpradesh) मिर्झापूर जिल्ह्यातून भीषण अपघात (Accident News) झाल्याची बातमी समोर आली आहे. काल रात्री उशिरा जीटी रोडवरील कटका गावाजवळ ट्रकच्या धडकेत १० जणांचा मृत्यू झाला. या ट्रकने भदोही जिल्ह्यातून बनारसला जाणाऱ्या ट्रॅक्टरला मागून धडक दिली. जोरदार झालेल्या धडकेमुळे या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १ वाजेच्या सुमारास मिर्झा मुराद कांचवा सीमेवर रस्ता अपघात झाल्याची माहिती मिळाली. भदोही जिल्ह्यातून १३ जणांना घेऊन बनारसला जात असलेल्या ट्रॅक्टरला एका अनियंत्रित ट्रकने मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. यामध्ये ट्रॅक्टरमधील १३ जणांपैकी १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमी झालेल्या तिघांनाही उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयामुळे न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

PM Modi : ट्रम्पच्या धमक्यांना मोदींचं एका वाक्यात उत्तर : "शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार"

अमेरिकेच्या ५०% टॅरिफवर मोदींचा ठाम पवित्रा नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर ५० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याचा

११९ देशांमधील ५६० कोटी लोकांना चिकनगुनियाचा धोका

२० वर्षांपूर्वी जगभरात केला होता कहर नवी दिल्ली : सुमारे २० वर्षांपूर्वी जगभरात कहर करणारा हा विषाणू पुन्हा

Go Back To India...', आयर्लंडमध्ये ६ वर्षांच्या मुलीवर हल्ला

नवी दिल्ली: आयर्लंडच्या वॉटरफोर्ड शहरात ६ वर्षांच्या भारतीय वंशाच्या मुलीवर एका किशोरवयीन टोळीने वर्णद्वेषी

अमेरिकेचा निर्णय दुर्दैवी आणि अन्यायकारक, ट्रम्प यांच्या आदेशानंतर भारताची प्रतिक्रिया

नवी दिल्ली: अमेरिकेने भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने

एकनाथ शिंदे यांनी घेतली नरेंद्र मोदींची सहकुटुंब भेट, शिवसेना-मनसेच्या युतीवरुन दिली 'ही' प्रतिक्रिया

नवी दिल्ली: नवी दिल्ली दौऱ्यावर असताना आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची