Shivneri Sundari : एसटीच्या नव्या अध्यक्षांनी शिवनेरी सुंदरीची भुरळ सोडून कर्मचारी व प्रवाशांच्या समस्येकडे लक्ष द्यावे

Share

महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांची मागणी

मुंबई : एसटीचे कर्मचारी हे ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ व ‘सुंदरी’ पेक्षा चांगली सेवा प्रवाशांना देत असून ‘शिवनेरी सुंदरी’ची भुरळ सोडून नवीन अध्यक्षांनी एसटी कर्मचारी व प्रवाशांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

महामंडळाच्या संचालक मंडळाच्या ३०४व्या सभेत महामंडळाचे नवीन अध्यक्ष भरत गोगावले यांनी शिवनेरी सुंदरीची नेमणूक करण्याची घोषणा केली असून ती परिस्थितीला अनुसरून नाही. आजही कर्मचारी व प्रवाशांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. व ते केल्यास उत्पन्न वाढ होऊन प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा देता येतील.

शिवनेरी बाबतीत बोलायचे झाल्यास ही सेवा महामंडळातील अत्यंत चांगली व फायदेशीर सेवा असून साधारण १२० इलेक्ट्रिक व डिझेल वरील बस या सेवेत आहेत. एसटीच्या वेगवेगळ्या सेवांच्या तुलनेत या सेवेला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून या सेवेचे सरासरी भारमान हे ८० टक्के इतके आहे. या सेवेत अजून गाड्या वाढविण्याची गरज असून त्याची व्याप्ती निव्वळ पुणे, मुंबई, ठाणे या पुरती मर्यादित न ठेवता राज्यभर वाढवली पाहिजे. आजही मागणीच्या तुलनेत सर्वच सेवेतील गाड्या कमी पडत असून त्यात प्रवाशांना अजून सेवा सुविधा दिल्या पाहिजेत.

एसटी कर्मचारी व अधिकारी हे अत्यंत चांगले काम करीत असून जुन्या झालेल्या गाड्या घेऊन त्यांनी महामंडळ नफ्याच्या जवळ पोहोचवले आहे. ब्रँड ॲम्बेसेडर व शिवनेरी सुंदरीवर खर्च करण्यापेक्षा वाढीव वेतनाचा फरक, महागाई भत्त्याची थकबाकी व वार्षिक वेतनवाढ प्रलंबित थकबाकी द्यावी. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चैतन्य वाढून उत्पन्न वाढेल व ते ब्रँड ॲम्बेसेडर व शिवनेरी सुंदरी पेक्षा प्रवाशांना चांगल्या प्रकारे सेवा देतील यात शंका नाही, असेही बरगे यांनी म्हटले आहे.

विमान सेवा ही सलग सेवा असून तिला शक्यतो थांबे नसतात. त्यामुळे त्यांना खान पान देण्यासाठी हवाई सुंदरीची गरज असते. एसटीची कुठलीही सेवा ही थांब्याशिवाय नसून शिवनेरीच्या पुणे, मुंबई या सेवेत सुद्धा गाड्या चहा पाण्यासाठी थांबत असतात. त्यामुळे या गैरलागू योजनेचा फेरविचार करावा, अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

Recent Posts

पाक नागरिकांच्या व्हिसाला स्थगिती, ४८ तासांत देश सोडण्याचा अल्टिमेटम, भारताचे पाकिस्तानविरुद्ध मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…

4 minutes ago

कोकणातील माकडे व वानरांचे निर्बीजीकरण करणार!

निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…

48 minutes ago

६४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत जाहीर

गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…

60 minutes ago

SRH vs MI, IPL 2025: सनरायजर्स हैदराबादचे मुंबईला १४४ धावांचे आव्हान, क्लासेनची जबरदस्त खेळी

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…

2 hours ago

पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार!

राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…

2 hours ago

IPL सामन्यात काळी पट्टी बांधून उतरले खेळाडू, चिअरलीडर्स गायब…पहलगाम हल्ल्यानंतर झाले हे बदल

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…

2 hours ago