Nitesh Rane : सरपंचाची निवडणूक हरलेला व्यक्ती आता निवडणुकीची गणितं शिकवायला जातो!

नितेश राणे यांचा संजय राऊतवर हल्लाबोल


मुंबई : काल अमित शहा (Amit Shah) यांच्या मुंबई दौऱ्याबद्दल (Mumbai Daura) बोलत असताना भाजपाकडे तळाघळात कार्यकर्ते राहिले नाहीत आणि म्हणूनच अमित शहा साहेबांनी बुथ लेव्हलचे उबाठा आणि तुतारीचे कार्यकर्ते फोडा असं सांगितलं. त्यावर अशा पद्धतीचा जावई शोध असा समज संजय राजाराम राऊतने (Sanjay Raut) काढला. मात्र अमित शहा यांच्या बोलण्याचा अर्थ, बुथ स्तरावर भाजपा पक्षाला मजबूत करा, बुथवर लक्ष ठेवा. आपला बुथ जेवढा मजबूत असेल निवडणूक तेवढीच सोप्पी जाईल, असा होतो. पण ज्याने कधी साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाही, त्याला निवडणूक काय कळणार असा हल्लाबोल भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला.


निवडणुकीच्या एकंदरीत प्रक्रियेमध्ये महायुती भाजपा पक्ष म्हणून आमचा मतदार कसा वाढेल, याबाबत अतिशय सुंदर मार्गदर्शन अमित शहा यांनी केलं. परंतु राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये अर्धमतांनी निवडून आलेल्या व्यक्ततीला निवडणुकीचा अर्थमॅटीक काहीच समजणार नाही. ज्याला साधी निवडणुक व्यवस्थित जिंकता आली नाही तो निवडणुकीची गणितं शिकवायला जातोय, अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केली. त्याचबरोबर महायुतीचं सरकार अतिशय भक्कम पद्धतीने महाराष्ट्रात परत येत आहे. त्यासाठी अमित शहा यांचा हा दौरा कारणीभुत ठरेल, असा विश्वासही नितेश राणे यांनी दाखवला.



नितेश राणे यांचा संजय राऊतला सल्ला


आज संजय राजाराम राऊतचं गांधीजींवर प्रेम फार उसळून येत होतं. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला देश म्हणून गांधीजींचा देश कसा ओळखला जातो, हे संजय राजाराम राऊतने म्हणण्याआधी पाकिस्तानमध्येही भारत देश हा गांधीजींचा देश आहे, अशी ओळख निर्माण करण्यामागे महात्मा गांधी कारणीभूत आहेत. त्यामुळे गांधींजींपुढे बोलण्याआधी संजय राजाराम राऊतने हिंदुह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, नथुराम गोडसे यांच्यावरील भाषणं, गांधीजींवरील भाषणं याचे जुने संदर्भ काढून महाराष्ट्राला माहिती द्यावी, असा सल्ला नितेश राणे यांनी दिला.



....म्हणून एकनाथ शिंदे यांना ती भूमिका घ्यावी लागली


माझा पक्ष आणि संघटना ही मजबुत झालीच पाहिजे, अशी भावना अमित शहा यांच्यामध्ये असल्यामुळे ते कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी वारंवार महाराष्ट्रात येत आहेत. पण संजय राजाराम राऊतला हे कधीच कळणार नाही. त्याचा मालक जो पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री असताना स्वत:च्या पक्षाला आणि आमदाराला वेळ देऊ शकला नाही. म्हणूनच शिवसेना नावाची संघटना टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना भूमिका घ्यावी लागली. त्यामुळेच अमित शहा हे जे काही रसायन आहे ते संजय राजाराम राऊतला कधीच कळणार नाही.



संजय राऊत आणि आदित्य ठाकरे शेंबड्या मुलांसारखं मुहूर्त देतात


२०२९ साली होणाऱ्या निवडणुकीत भाजपा पक्ष १४०च्या खाली येतील, असा दावा केलेल्या संजय राऊतला नितेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. संजय राजाराम राऊतची कुठलीही भाकित खरी ठरली नाही. महायुतीचं सरकार आल्यापासून दर दोन महिन्यांनी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे शेंबड्या मुलांसारखं सरकार पडण्याचं मुहूर्त देत आहेत. परंतु त्यांची एकही तारीख खरी ठरली नाही. त्यामुळे २०२९ पर्यंत संजय राजाराम राऊत कुठल्या झाडावर असेल? कोणाचा झेंडा घेतला असेल किंवा कोणाच्या पगारावर जगत असेल याबद्दल आधी विचार करु त्यानंतर २०२९चा विषय करु, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.



मातोश्रीमधील ४२० कडून महाराष्ट्राला धोका


नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर बोट उचलण्याआधी मुख्यमंत्रीच्या काळात मुंबईला लुटलं, ओरबडलं अशा मातोश्रीमध्ये तिसऱ्या मजल्यावर बसलेल्या ४२० कडून महाराष्ट्राला सर्वात मोठा धोका आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर बोट उचलण्याआधी संजय राजाराम राऊच्या मालकाने मुंबईला ओरबाडण्याचा जो काही कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे तो संपवायला सांगा. तो जेवढे दिवस महाराष्ट्रात राहील तोपर्यंत महाराष्ट्रातील जनतेला सुखी आणि सुरक्षित राहायला देणार नाही. लवकरात लवकर त्याला लंडनला पाठवून द्या, अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली आहे.



स्वत:चा मालक याच्या शब्दावर विश्वास ठेवत नाही


त्याचबरोबर सर्व संपत्ती श्रीधर पाटणकर यांच्या नावाची असली तरीही खरे मालक रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेत. दिवसा १० वाजता अडाणी आणि अंबानी यांना शिव्या घालायच्या त्यांच्या नावाने खडी फोडायची आणि रात्री यांना मातोश्रीवर बोलावून घ्यायचं. या प्रकारचा बंटी बबलीचा धंदा सुरु आहे, असा खट्याळ आरोपही नितेश राणे यांनी केलाय.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या