Sunday, October 6, 2024
Homeताज्या घडामोडीEknath Shinde : नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, डीनच्या...

Eknath Shinde : नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, डीनच्या बदलीचे दिले आदेश!

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची (Nayar Hospital Rape Case) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. याच बरोबर पीडितांना न्याय मिळवून देण्याची खात्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना रुग्णालयाच्या डीनची तात्काळ बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येणार आहे. रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात येतील, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

घडलेल्या प्रकारावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आरोग्य क्षेत्रातील अशा घटना अत्यंत गंभीर आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करू. रुग्णालयातील सर्वांसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे आमचे कर्तव्य आहे.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -