मान्सून परतीच्या मार्गावर, तापमानात वाढ

पुणे : परतीच्या प्रवासावर निघालेला मान्सून (monsoon) काही अडथळ्यांमुळे धीम्या गतीने पुढे सरकत आहे. मात्र, सोमवारपासून या प्रवासाला गती मिळत असून, आणखी वेगाने मान्सून परतण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. मात्र मान्सून परतीच्या मार्गावर असताना, तापमानात वाढ होत आहे. मात्र यंदा पावसाने समाधानकारक कामगिरी केली आहे.


महाराष्ट्रातील दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे यलो अलर्ट जारी केला गेला आहे. मात्र, कोकण वगळता राज्याच्या उर्वरित भागांमध्ये पाऊस उघडीप देणार असून, काही ठिकाणी हलकी रिमझिम होण्याची शक्यता आहे.



'ऑक्टोबर हिट'चे संकेत


पावसाने विश्रांती घेतल्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान वाढत आहे. त्यामुळे 'ऑक्टोबर हिट'च्या सुरुवातीचे संकेत मिळत आहेत. सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि बीड या भागांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी पडतील, पण त्यातून कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदाच्या वर्षी भारतात एकूण ९३४.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे, जे सरासरीच्या १०८ टक्के आहे. विशेषत: मध्य भारतात १९ टक्के आणि पूर्व-पूर्वोत्तर भागात १४ टक्के अधिक पाऊस झाला आहे. जूनमध्ये ११ टक्के कमी पाऊस झाला असला तरी जुलैमध्ये पावसाचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

Comments
Add Comment

‘समग्र शिक्षा’ अभियानाच्या भविष्यातील आराखड्याबाबत केंद्र शासनाकडून मार्गदर्शन मागविले; महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेची माहिती

मुंबई: ‘समग्र शिक्षा’ ही केंद्र शासनाची योजना देशात सर्वत्र राबवली जाते. समग्र शिक्षा योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत

Akola Crime News : अकोला हादरलं! 'धुरंधर' सिनेमा पाहून आले अन् दिवसाढवळ्या तिघांवर सपासप वार

अकोला : नांदेडमधील तिहेरी हत्याकांड ताजे असतानाच आता अकोला शहरातही तशीच धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील कौलखेड

वर्तमान व भविष्यातील आव्हानांचा विचार करुन शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘महाराष्ट्र ज्ञान सभा-2026’राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन नागपूर : वैश्विक ज्ञानाचे भारतीयीकरण व भारतीय ज्ञानाचे

Pune Railway Station : पुणे - रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट

पुणे : पुणे स्थानकाच्या मुंबईच्या दिशेने असलेल्या यार्डमध्ये सहा नवीन फलाट होणार आहेत. फलाट क्रमांक ७ ते १२ असे

Nashik Simhastha Kumbh Mela : नाशिक - कुंभमेळा विषयक विकास कामांची राजेश अग्रवाल यांच्याकडून पाहणी

वेळेत कामे पूर्ण करण्याच्या यंत्रणांना दिल्या सूचना नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर

पाणी तुंबणाऱ्या २२७ पैकी १२० ठिकाणी सोमवारपासून कामे सुरू - पुणे महापौर

पुणे : पावसाने गुरुवारी पुणे शहर अक्षरशः तुंबले, रस्ते पाण्याखाली गेले. घरांत, दुकानात पाणी शिरले आणि एका ज्येष्ठ