Nashik Simhastha Kumbh Mela : नाशिक - कुंभमेळा विषयक विकास कामांची राजेश अग्रवाल यांच्याकडून पाहणी

वेळेत कामे पूर्ण करण्याच्या यंत्रणांना दिल्या सूचना


नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि परिसरात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा विषयक कामांना मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी भेटी दिल्या. पायाभूत सुविधांची कामे विहित वेळेत आणि दर्जेदार झाली पाहिजेत. त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी काम करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.


मुख्य सचिव . अग्रवाल यांनी आज कुंभमेळा विषयक रस्ता कामे तसेच रेल्वे विषयक विकास कामे, विमानतळ विस्तारीकरण, पार्किंग सुविधा आदी कामांना भेटी दिल्या. कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पुनीत अग्रवाल, कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग, विमानतळ प्राधिकरण आणि एचएएलचे अधिकारी तसेच विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.


मुख्य सचिव.अग्रवाल यांनी सुरुवातीला स्व. मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल येथे जाऊन पाहणी केली. तेथे सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत करावयाच्या पार्किंग सुविधा संदर्भातील नियोजनाची माहिती घेतली. मुख्य सचिव अग्रवाल यांनी ओढा रेल्वे स्टेशन येथे जाऊन तेथे होत असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पुनीत अग्रवाल आणि विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी माहिती दिली. नाशिक रोड रेल्वे स्थानकासह ओढा, कसबे सुकेणे, खेरवाडी, देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक परिसर विकास, प्रवाशांसाठी सोई सुविधा, येणाऱ्या भाविकांसाठी बस कनेक्टिव्हिटी आदींची माहिती मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांनी घेतली. ओढा येथे कुंभमेळा साठी बांधण्यात येत असलेल्या घाट कामांचीही त्यांनी पाहणी केली.


त्यानंतर मुख्य सचिव अग्रवाल यांनी, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणामार्फत मुंबई धुळे महामार्गावरील नाशिक शहरातील विकास कामांची पाहणी केली. कामांची गती वाढविण्याच्या सूचना यावेळी त्यांनी यंत्रणेला केल्या. काम करताना प्रशासकीय आणि तांत्रिक पातळीवर काही अडचणी जाणवत असतील तर त्या तत्काळ निदर्शनास आणून द्याव्यात आणि कोणत्याही परिस्थितीत कामांना विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व यंत्रणांना केल्या.

Comments
Add Comment

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि

Amravati : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची NHRCकडून स्वतःहून दखल; महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस

अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा