मराठी कलाविश्वातली अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही उत्तम अभिनयाच्या जोरावर ती कायम चर्चेत येत असते.
सोनालीने अलिकडेच गुलाबी रंगाच्या साडीत फोटोशूट केलं. नेटकऱ्यांमध्ये या फोटोशूटची कमालीची चर्चा झाली.
सोनालीच्या साडीवर फ्लेमिंगो आणि फुलपाखरूचं सुंदर वर्क केलं आहे.
सोनालीने या साडीवर केस मोकळे सोडून गळ्यात सुंदर असा नेकलेस परिधान केला आहे.
सोनालीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
सोनालीचा या फोटोंमध्ये अंदाज खूपच बोल्ड आणि मोहक दिसतो आहे.
मराठीत सोनालीने एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने दमदार काम केलं आहे.
सोनालीने ‘अंजिठा’, ‘झपाटलेला २’, ‘पोस्टर गर्ल’, ‘मितवा’, ‘क्लासमेट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.
याचवर्षी सोनालीनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलंय, ‘मलाइकोट्टई वालीबान’ या चित्रपटाच्या निमित्ताने सोनाली पहिल्यांदाच मल्याळम चित्रपटसृष्टीत झळकली.
आता सोनाली होऊ दे चर्चा कार्यक्रम आहे घरचा या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.