बांगलादेशी पॉर्नस्टार रिया बर्डे उल्हासनगरमध्ये सापडली!

Share

वेश्याव्यवसायाशी संबंधित एका प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केलेली रिया ओळख लपवून करीत होती वास्तव्य

उल्हासनगर : ओळख लपवून भारतात राहणाऱ्या पॉर्न स्टार रिया बर्डेला (Pornstar Riya Barde) महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यावर बनावट कागदपत्रे बनवून भारतात राहिल्याचा आरोप आहे. तपासात पॉर्न स्टार रिया बर्डे ही बांगलादेशी नागरिक असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तिला ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथून अटक केली आहे.

पॉर्न जगात रियाला आरोही बर्डे किंवा बन्ना शेख या नावानेही ओळखले जाते. मूळ बांगलादेशी असूनही रिया बनावट कागदपत्रांद्वारे तिची आई, भाऊ आणि बहिणीसोबत बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करीत होती. रियाचे आई आणि वडील कतारमध्ये आहेत, तर पोलीस रियाच्या भावाचा आणि बहिणीचा शोध घेत आहेत.

रिया बर्डे मूळची बांगलादेशी असून तिच्या आईने अमरावती येथील एका व्यक्तीशी लग्न केल्याचा आरोप आहे. रिया शिवाय पोलिसांनी तिची आई अंजली बर्डे उर्फ ​​रुबी शेख, वडील अरविंद बर्डे, भाऊ रवींद्र उर्फ ​​रियाझ शेख आणि बहीण रितू उर्फ ​​मोनी शेख यांच्यावरही बेकायदेशीरपणे भारतात राहण्याचा आरोप केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, रिया राज कुंद्राच्या प्रोडक्शनशी संबंधित होती आणि तिने अनेक पॉर्न फिल्म्समध्ये काम केले आहे. पोलिसांना तपासात आढळून आले की रियाची आई अंजली ही बांगलादेशची रहिवासी आहे आणि ती रिया, तिच्या दोन मुली आणि मुलासह भारतात बेकायदेशीरपणे राहत होती.

रियाची आईने आपण पश्चिम बंगालचे रहिवासी असल्याचे भासवून अमरावती येथील अरविंद बर्डे यांच्याशी लग्न केले. तसेच भारतीय ओळख सिद्ध करण्यासाठी बनावट जन्म प्रमाणपत्रे आणि इतर बनावट कागदपत्रे सादर करून स्वतःसाठी आणि तिच्या मुलांसाठी भारतीय पासपोर्ट मिळवले. रियाचे आई आणि वडील दोघेही सध्या कतारमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तसेच पोलीस तिच्या भावाचा आणि बहिणीचाही शोध घेत आहेत.

रियाला यापूर्वी मुंबई पोलिसांनी वेश्याव्यवसायाशी संबंधित एका प्रकरणात अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायद्यांतर्गत अटक केली होती, असे पोलिसांनी सांगितले.

रियाचा मित्र प्रशांत मिश्रा याला ती मूळची बांगलादेशची असून बेकायदेशीरपणे भारतात राहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही बाब उघडकीस आली. त्यांनी याबद्दल पोलिसांकडे तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

37 minutes ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

38 minutes ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

45 minutes ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

49 minutes ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

58 minutes ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

1 hour ago