पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात!

दीपक मोहिते


पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुण्याच्या (Pune) दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते एकूण १२ प्रकल्पाचे भुमीपूजन करणार आहेत. पण ज्या एस.पी.महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे, त्या मैदानावर प्रचंड चिखल झाल्यामुळे सभेची जागा बदलण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) पथकाचा आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections 2024) दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (State Government) घाईघाईने या प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन उरकण्यात येत आहे. तसेच लवकरच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यामुळे मोदी व शहा या दोघांनी " मिशन महाराष्ट्र," हाती घेतले आहे. या अंतर्गत त्यांनी अनेक प्रकल्पाचा शुभारंभ करण्याचा सपाटा लावला आहे.


अवघ्या दीड तासाच्या त्यांच्या या दौऱ्यात ते अत्यंत वेगाने १२ प्रकल्पाचे भूमिपूजन व तसेच उदघाटने पार पाडणार आहेत. त्यानंतर ६.५५ वाजता ते दिल्लीकडे प्रयाण करणार आहेत.संध्याकाळी जर पुन्हा पावसाला सुरुवात झाली तर मोदी यांच्या सभेचे ठिकाण बदलण्यात येणार आहे, पर्यायी व्यवस्था म्हणून गणेश कला व संस्कृती मंडळाचे सभागृह राखीव ठेवण्यात आले आहे.


गेल्या लोकसभा निवडणुकीत नागपूर, अमरावती, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, ठाणे व सोलापूर,नांदेड,या शहरात भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे मोदी व शहा यांनी या शहरात येजा सुरू केली आहे. त्यांच्या या दौऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हेदेखील पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

Comments
Add Comment

Pandharpur : पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन दोन दिवस बंद राहणार

पंढरपूर : पंढरपुरचे विठ्ठल मंदिर २३ आणि २४ जून रोजी विठ्ठल मंदिर सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार

Raigad News: आईने चार मुलांना विषारी थंडपेय पाजून स्वतःही केले विषप्राशन; तिघांचा मृत्यू, दोन मुलांची प्रकृती गंभीर

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण

Palghar Crime : पालघरमध्ये भररस्त्यात तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; CCTV व्हायरल, प्रकृती चिंताजनक

Palghar Crime : पालघर : पालघर (Palghar) शहरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला (Attack) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली

Crime News: धक्कादायक! लग्नात अडथळा ठरत असल्याने प्रेयसीची निर्घृण हत्या; शिक्षकासह वडील आणि मामा अटकेत

दोडामार्ग: प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या नात्याचा शेवट एका धक्कादायक हत्याकांडात (Murder) झाला आहे. कर्नाटकातील

Maharashtra Monsoon Weather Alert : महाराष्ट्रात निसर्गाचा लहरी खेळ! कुठे मुसळधार पाऊस, तर कुठे उष्णतेची लाट; मान्सून कधी येणार?

केरळमध्ये वेळेवर दाखल झाल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे ६ जून रोजी महाराष्ट्रात प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर

Bhimashankar Temple : भाविकांसाठी आनंदाची बातमी! 5 महिन्यांनंतर भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून खुले; गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था

पुणे: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर (Bhimashankar Temple) हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तब्बल पाच ते सहा