Nitesh Rane : मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर पॉर्नस्टार राहतो!

नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेवर साधला निशाणा


मुंबई : बदलापूरमध्ये स्वसंरक्षणामुळे जो एन्काऊंटर (Badlapur Encounter) पोलिसांनी केला त्याचं समर्थन करण्यापेक्षा त्या दिवसापासून महाविकास आघाडीच्या (MVA) सर्व नेते मंडळींना मिरच्या झोंबल्या आहेत. त्यामुळे मविआकडून राज्यभरातील सर्व महिलामंडळांच्या मनात देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल द्वेष निर्माण करण्यात येत आहेत. मात्र तरीही भाजपाचे देवाभाऊ सिंघम म्हणजेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे गृहमंत्री असल्यामुळे महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत. त्यांच्याकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहिलं तर देवाभाऊ त्यांना जागेवर ठेवणार नाही, अशा पद्धतीची भावना राज्यातल्या माताभगिनींच्या मनात तयार झालेली आहे. त्यामुळे महिलांना अश्लीय शिव्या आणि धमक्या देणा-या संजय राजाराम राऊत याने सकाळी उठून झाकणझुल्यासारखी बडबड करणे बंद करावे. तसेच महिला अत्याचार आणि बलात्काराबद्दल त्याने तोंडच उघडू नये, अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली. त्याचबरोबर संजय राऊतच्या मालकासह त्याच्या मुलावरही निशाणा साधला.


संजय राजाराम राऊतवर आजही डॉ. सपना पाटकरला छळण्याचा, धमकवण्याचा आरोप आहे. तिच्या घरावर दारुच्या बाटल्या मारल्या अशी व्यथा तिने व्यक्त केली. त्यामुळे संजय राऊतने सर्वात आधी त्या डॉक्टर महिलेला का आणि कशा प्रकारे छळतोस याबद्दल थोडी माहिती दे, तिची माफी माग आणि मग देवाभाऊ आणि आमच्या सरकारवर सिंगम आणि या सर्व गोष्टीची बडबड करण्याची हिंमत कर. नाहीतर कधीतरी त्या बहिणीला सुरक्षित ठेवण्यासाठी देवाभाऊचा वार तुझ्यावरही चालवावा लागेल, असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतला फटकावले.


त्याचबरोबर पॉर्न फिल्म आणि संजय राजाराम राऊतच्या मालकाच्या मुलाचा काय संबंध हे कधीतरी आम्हाला बोलावं लागेल. मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर पॉर्नस्टार ठाकरे राहतो, त्याच्याही चित्रपटाची वेबसिरीज काढावी लागेल. मग तो किती विकृत आहे ते सर्व जगाला कळेल. लहान मुलांच्या चित्रपटामध्ये त्याचा काय रोल आहे, म्हणून उगाच संघ किंवा भाजपा पक्षाचे नेते मंडळींना बोलण्याआधी मातोश्रीमध्ये राहत असणारा पॉर्नस्टार ठाकरेला आधी आवर, अन्यथा आम्हाला गावागावांमध्ये मोठे स्क्रिन लावून या पॉर्नस्टार ठाकरेचे चित्रपट रिलीज करावे लागतील, असा निशाणाही नितेश राणे यांनी साधला.



महिला मातोश्रीमध्ये येण्यास घाबरतात


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जीवंत असताना महिलांना मातोश्री सुरक्षित वाटायची. पण आज तिथे राहत असलेल्या एका विकृतामुळे मातोश्रीमध्ये महिला येण्यास घाबरतात. त्यामुळे मातोश्रीमध्ये राहत असलेल्या बलात्काऱ्याबद्दल शक्तीकपूर आणि रंजीतची भूमिका राबवणाऱ्याला तुम्ही आवर घाला, असेही नितेश राणे यांनी म्हटले.



संजय राऊत एक ठग्या आहे


आता उपमुख्यमंत्री पदालादेखील पुर्णविराम येईल, संजय राऊतने केलेल्या या वक्तव्यावर नितेश राणे यांनी धारदार टिकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की, संजय राजाराम राऊत नावाचा जो पोपट आहे, तो नेहमी सरकार पडणार, पुर्णविराम मिळणार असं बोलत आहे. पण कधीही त्याची भविष्यवाणी खरी ठरली नाही. संजय राजाराम राऊत हा चौपाटीवर बसून झोली घेऊन भविष्यवाणी सांगणाऱ्यांसारखा एक ठग्या आहे, अशी खिल्ली नितेश राणे यांनी उडवली.

Comments
Add Comment

महापुरुषांची नावे संक्षिप्त घेणाऱ्यांवर कारवाई करा; शिवसेना नगरसेवकांची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या वतीने जोगेश्वरी रुग्णालयाचे नामकरण हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब

महापालिका शाळांमधील न्युट्रीबार वादात; मध्यान्ह भोजनात इस्कॉनच्या खिचडीची झाली मागणी

मुंबई: मुंबई महापालिका शाळांमधील मुलांना पोषक आहारांतर्गत देण्यात येणाऱ्या न्युट्रीबारच्या वाटपाबाबत आता

मुंबईतील टँकर माफियांची लॉबी नष्ट करा; महापालिका सभागृहात सर्वच नगरसेवकांची एकमुखी मागणी

मुंबई: मुंबईत सध्या पाण्याची काही भागांमध्ये समस्या निर्माण झाली असून ही टंचाई फक्त आणि फक्त टँकर माफियांसाठी

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात