अमित शाह यांचा दौरा; उबाठाने घेतला धसका!

दौऱ्यावर टीका करणाऱ्या उबाठाच्या राऊतांना आमदार नितेश राणेंनी सुनावले


कणकवली : देशाचे गृहमंत्री, भाजप नेते अमित शाह (Amit Shah) नाशिक दौऱ्यावर आहेत त्यामुळे उबाठा (Uddhav Thackeray) आणि संजय राऊतला मिरच्या लागत आहेत. भाजप कार्यकर्ता मोठ्या पदावर गेला तरी पक्ष आणि संघटनेसाठीची निष्ठा गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून ठाकरे आणि राऊत यांनी शिकावी. तुला आणि घर कोंबड्या मालकाला अमितभाई यांचे कर्तृत्व आणि पक्ष निष्ठा समजणार नाही.तुझ्या मालकाने शिवसैनिकांना,आमदार आणि जिल्हा प्रमुखांना मुख्यमंत्री असताना भेट दिली असती तर पक्ष फुटला नसता आणि तुमची अशी अवस्था झाली नसती. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी अमितभाई शाह यांचा आदर्श घ्यावा असा सल्ला भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला.


कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले,अमित शाह हे जेष्ठ नेते असून बलवान व कार्यतत्पर नेते आहेत. त्यांच्याकडे देशासाठी आणि पक्षासाठी वेळ आहे.त्यांनी देश हिताचे जे निर्णय घेतले त्या नंतर जनतेने देशभर ते स्वीकारले म्हणून आज देशात शांतता आहे. त्यामुळे संजय राऊतने लडाख, काश्मीरपेक्षा पत्राचाळीत जाऊन सभा घ्यावी मग त्याला चप्पल पडतील आणि स्वतःची लायकी कळेल. २०१४ पासून अमित शाह येत आहेत. तुझा मालक भेटीला जायचा तेव्हा तुम्हाला त्यांच्या दौऱ्यांचा फायदा व्हायचा आता तुमचा पराभव होणार असल्यामुळे अमित शाह यांच्या दौऱ्याची भीती उबाठा पक्षाला वाटू लागली आहे. ज्यांची वापरा आणी फेका यात संजय राऊत याचा मालक उद्धव ठाकरे यांची पी एच डी झालेली आहे. त्यांनी तर सख्खा भाऊ चुलत भाऊ यांचा वापर करून फेकून दिले. शिवसेनेचे नेते असलेले एकनाथ शिंदे, राणे साहेब, गणेश नाईक, चुलत भाऊ राज ठाकरे, स्वतःचा सख्खा भाऊ यांच्या हव तेव्हा वापर केला आणि फेकले.भाजप हा मित्र पक्षांना घेवून त्यांना मोठे करणारा आहे.संजय राऊतने "मुंगेरी लाल चे हसीन सपने" पाहू नयेत. भाजप आणि महायुतीचे पुन्हा सरकार येणार आहे.आणि संजय राऊत आमच्या मिरवणुकीत नाचणार सुद्धा आहे असा टोला लगावला.


अक्षय शिंदे संत-महात्मा होता का? त्याला पोलिसांनी स्वतःच्या सुरक्षे साठी मारला तर ठाकरे, तुतारी वाले,काँग्रेस यांना दुःख का झाले. तुम्हाला पोलिसांचे बळी पाहिजे होते काय? कोणाची बाजू घेता ? यांचा तरी विरोधकांनी विचारा करावा अशा शब्दात सुनावले. राजकोट दुर्घटना घडली त्यानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांनी शिवरायांचा पुतळा पुन्हा उभारला जाईल. असे जाहिर केले होते. पहिल्या झालेल्या चुका आता होणार नाही. आपल्या सर्वांना अभिमान वाटेल असा शिवरायांचा पुतळा निर्माण होईल. असेही एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले.

Comments
Add Comment

State Government : आयुष्यमान भारत आणि जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहारांप्रकरणी एसआयटी

 १५ हजार ४०७ उपचारांचे दावे संशयास्पद; महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई : आयुष्मान भारत-पंतप्रधान

Amit Shah : एफसीआरए विधेयकावर अमित शाह बोलण्याची शक्यता

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील सलग गदारोळ आणि कामकाज थांबल्याचा तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारने

Women's Reservation Bill : परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयकांसाठी विशेष अधिवेशन घेण्याची केंद्र सरकारची तयारी; किरेन रिजिजू आणि राहुल गांधी यांची भेट

नवी दिल्ली : परिसीमन (Delimitation Bill) आणि महिला आरक्षणाशी (Women's Reservation Bill) संबंधित महत्त्वाच्या घटनादुरुस्ती विधेयकांवर केंद्र

Waqf Cases : वक्फ नोंदींच्या वादग्रस्त प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी विशेष बेंच

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा मुंबई : राज्यात

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Eknath Shinde : 'ज्ञानाचा महासागर हरपला'; डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने न भरून येणारी पोकळी निर्माण झाली

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले अंतिम