मुंबई महानगर क्षेत्रातील दळणवळण, पायाभूत सुविधा, आर्थिक विकास वाढीच्या प्रकल्पांना गती द्या – मुख्यमंत्री

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची १५८ वी बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुंबई महानगर क्षेत्रातील दळणवळण, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास वाढविण्याच्या प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. बॅकबे रिक्लेमेशन प्रारूप विकास आराखडा, बदलापूर ते विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरीडॉर प्रवेश नियंत्रित महामार्गासाठी सल्लागाराची नेमणुक आदी विषयांना यावेळी मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. एमएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे अडीच लाख कोटींची विकास कामे सुरू असून ती कालमर्यादेत पूर्ण करावीत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी आदी यावेळी उपस्थित होते.


बॅकबे रिक्लेमेशन योजनेचा सुधारित विकास आराखडा सादर करण्यात आला. त्यामध्ये समुद्रकिनारे आणि खारफुटीसारख्या नैसर्गिक वैशिष्ट्यांवर विशेष लक्ष देऊन या क्षेत्राचे निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. याभागात पर्यटनाला चालना मिळण्यासाठी ‘मरिना’ पर्यटन प्रकल्पाचा समावेश असून त्यामध्ये लहान बोटी आणि नौकांसाठी खास बंदर असणार आहे. हा सुधारित प्रारूप आराखडा मंजुर करून नागरिकांच्या सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध करण्याची मान्यता देण्यात आली.


कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूर या शहरांची मुंबई व नवी मुंबईशी थेट जोडणी करणेकरीता सल्लागाराने तयार केलेल्या बदलापूर ते विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरीडॉर या प्रवेश नियंत्रित महामार्ग प्रकल्पाचा प्राथमिक आखणी अहवालास मान्यता देण्यात आली. या मल्टीमोडल कॉरीडॉर प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याकरिता सल्लागाराची नियुक्ती करण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली.


भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम (एनपीसीआय) च्या कार्यालयाला वांद्रे कुर्ला संकुलातील जी ब्लॉकमधील भुखंड देण्यासही याबैठकीत मान्यता देण्यात आली. नीति आयोग व राज्य शासन यांनी संयुक्तरित्या मुंबई महानगर प्रदेशासाठी तयार केलेल्या आर्थिक बृहत आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाची प्रकल्प अंमलबजावणी प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी श्री. मुखर्जी यांनी सादरीकरण केले.

Comments
Add Comment

Shaina NC : मुंबईतील सर्व धोकादायक झाडांचे त्रयस्थ संस्थेकडून ऑडिट करा; शिवसेना राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन सी यांची मागणी

- चेंबूरमधील झाड पडून झालेल्या दुर्घटनेतील ११ वर्षीय विहान श्रीवास्तवच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाई

Devendra Fadnavis : गेमिंगमध्ये भारताची मोठी झेप! ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६ साठी ‘इंडिया रायझिंग’चा ऐतिहासिक मार्ग खुला

- ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६ च्या माध्यमातून महाराष्ट्र डिजिटल क्रिएटिव्ह अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करेल –

Devendra Fadnavis : राज्य सहकारी संघाचा शिक्षण निधी पुन्हा सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

- सहकारात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव मुंबई : "महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला १०७ वर्षांची उज्ज्वल परंपरा

Devendra Fadanvis : मुंबई, ठाणे, कोकणाला पावसाने झोडपले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रशासनाला दिल्या 'या' सूचना

मुंबई : राज्यातील अनेक भागांसह मुंबईत सध्या मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे

Mumbai Rain : धक्कादायक! भांडूपमध्ये रस्ता खचून टेम्पो अन् झाड बघता बघता जमिनीच्या पोटात गायब

पुढचे काही तास मुसळधार पावसाची शक्यता Mumbai : मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी, शहराच्या काही

मागील सहा तासात पावसाने मुंबईला झोडपले... अनेक परिसर जलमय, वाहतुकीसाठी मार्ग केले बंद

मुंबई  : मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असून उपनगरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. सकाळी आठ ते