Squid Game 2 : मृत्यूचा खेळ पुन्हा सुरु होणार!

'या' तारखेला होणार 'स्क्विड गेम २' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित


मुंबई : तीन वर्षांपूर्वी नेटफ्लिक्सवर (Netflix) स्क्विड गेम (Squid Game) ही वेबसीरिज (Web series)प्रदर्शित झाली होती. या सीरिजला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून जगभरात धुमाकूळ घातला होता. परंतु आता लवकरच स्क्विड गेम' (Squid Game 2) या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कोरियन वेब सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबतचा ट्रेलर (Trailer) रिलीज झाला असून प्रदर्शित होण्याची तारीख देखील समोर आली आहे.


ह्वांग डोंग-ह्युक लिखित आणि दिग्दर्शित स्क्विड गेम वेब सीरीजचा नुकतेच स्पेशल ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये, Game Will Not Stop म्हणजेच गेम थांबणार नाही, तुम्ही तयार आहात का? असे विचारण्यात आले आहे.


दरम्यान, स्क्विड गेम २ मध्ये ली जंग-जे, ली ब्युंग-हुन, वाई हा-जून आणि गॉन्ग यू यांच्यासह इतर नवे कलाकार दिसणार आहेत. तसेच नव्या सीझनमध्ये नवे ट्विस्ट देखील पाहायला मिळणार आहेत.






कधी होणार प्रदर्शित?


नेटफ्लिक्सने एक धमाकेदार ‘स्क्विड गेम २’चा टीझर प्रदर्शित करून प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. यंदा २६ डिसेंबरला ‘स्क्विड गेम २’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर अंतिम सीझन पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. तिसऱ्या सीझननंतर ‘स्क्विड गेम’चा प्रवासाला पुर्णविराम मिळणार आहे.

Comments
Add Comment

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं

‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी

अभिनेत्री करिश्माने मारली चालत्या लोकलमधून उडी

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा शर्मा हिचा मुंबईतील चर्चगेट येथे अत्यंत गंभीर अपघात झाला. करिश्मा स्वतःने