Haryana Elections : भाजपाच्या जाहीरनाम्यात २० आश्वासने तर काँग्रेसने दिली जनतेला ७ आश्वासने!

हरियाणात भाजपा देणार २ लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या, विद्यार्थ्यांना स्कूटर, महिलांना दरमहा २१०० रुपये


काँग्रेस देणार २ लाख तरुणांना सरकारी नोकरी तसेच ५ लाख तरुणांना रोजगाराच्या इतर संधी, शिवाय प्रत्येक कुटुंबासाठी १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार


रोहतक : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी (Haryana Elections) भाजपाने आज, गुरुवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. हे संकल्पपत्र पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि मुख्यमंत्री नायब सैनी यांनी रोहतक येथे जारी केले.


भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात हरियाणातील २ लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देणार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय सर्व महिलांना दरमहा २१०० रुपये दिले जातील. तसेच 'घर गृहिणी योजने'च्या माध्यमातून ५०० रुपयांना सिलिंडर दिला जाईल. पेन्शनमध्ये वाढ केली जाईल, नवीन वंदे भारत गाड्या सुरू करणार, ग्रामीण भागातील प्रत्येक महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कूटर दिल्या जातील, हरियाणाला जागतिक शिक्षणाचे केंद्र बनवणार. याशिवाय इतरही अनेक आश्वासने भाजपाने दिली आहेत.


दुसरीकडे काँग्रेसने हरियाणातील जनतेला ७ आश्वासने दिली आहेत. काँग्रेसच्या संकल्प पत्रानुसार राज्यात सरकार आल्यास महिलांना लाडो लक्ष्मी योजनेंतर्गत २१०० रुपये दिले जातील. शहरी आणि ग्रामीण भागात ५ लाख घरे, एमएसपीवर घोषित झालेल्या २४ पिकांची खरेदी केली जाईल. प्रत्येक कुटुंबासाठी १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील. तसेच ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा मिळेल. राज्यातील २ लाख तरुणांना सरकारी नोकरी तसेच ५ लाख तरुणांना रोजगाराच्या इतर संधी आणि नॅशनल अप्रेंटिस प्रमोशन योजनेतून मासिक स्टायपेंड दिले जाईल. लहान मागास जातींसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळे बनवणार. निवृत्ती वेतनामध्ये वाढ करणार. दक्षिण हरियाणात आंतरराष्ट्रीय स्तरावरील अरवली जंगल सफारी पार्क बनवणार. देशातील कोणत्याही सरकारी महाविद्यालयातून वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या ओबीसी आणि एससी प्रवर्गातील हरियाणातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल. त्यासोबतच राज्य सरकार ओबीसी श्रेणीतील उद्योजकांसाठी मुद्रा योजनेव्यतिरिक्त २५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची हमी देणार असून प्रत्येक जिल्ह्यात ऑलिम्पिकच्या खेळांसाठी प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Comments
Add Comment

संपलेल्या पक्षासोबत युती, तब्बल ८० जागा टाकणार झोळीत

उबाठा पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी, बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उबाठा आणि मनसेची युती

खासदार, आमदार, माजी आमदारांची आपल्या नातेवाईकांसाठी तिकीटाकरता फिल्डींग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुती आणि ठाकरे बंधूंची युतीची झालेली असून

माजी खासदार राहुल शेवाळेंची वहिनी थेट धारावीतून लढणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शिवसेनेचे सरचिटणीस आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांची वहिनी वैशाली शेवाळे या

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक जाहीर

पुणे : मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी १५ मे रोजी मतदान आणि १६ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या

उद्धव ठाकरेंनी मराठी माणसासाठी केलेले एक काम संजय राऊतांनी दाखवावे

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे थेट आव्हान उद्धव ठाकरे आणि उबाटा गट यांनी मराठी माणसाच्या हितासाठी काय

१६ जानेवारीला आपण अटलजींना खरी आदरांजली द्यायची आहे" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : आज संपूर्ण देशभरात अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या निमित्त भाजपा