Pune News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! उद्या पिंपरी चिंचवड हद्दीतील पाणीपुरवठा राहणार बंद

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Municipal Corporation) क, फ, ई या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील पाणीपुरवठा उद्या १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी बंद राहणार आहे. तसेच २० सप्टेंबर रोजीचा पाणीपुरवठा अपुरा व कमीदाबाने होणार (Water Supply) असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.


पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या चिखली जलशुद्धीकरण केंद्र आणि तळवडे नदीजल उपसा केंद्र या ठिकाणी विद्युत पुरवठा करणाऱ्या भोसरी RS2 सबस्टेशन येथे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे १९ सप्टेंबर रोजीचा वीजपुरवठा सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे क फ आणि ई या क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा सकाळी नियमित वेळेत होणार असून संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशीचा पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार आहे.


त्यामुळे सर्व नागरिकांनी महापालिकेकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने पाण्याचा वापर करावा आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

‘आंदोलन कायम ठेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार’- बच्चू कडू

मुंबईला जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार नागपूर : कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातल्या आरोपीने लपवलेल्या मोबाईलमध्ये मिळाला मृत्यूपूर्वीचा 'तो' फोटो...

फलटण: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा झाला आहे. आत्महत्या

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हिव्हिपॅट नाहीच; काय दिलं निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत कायद्यांत तरतूद नाही मुंबई : स्थानिक

Maharashtra Local Body Election : १० नोव्हेंबरआधी आचारसंहिता लागू होणार? मोठी अपडेट आली समोर

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी माहिती

महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी वातावरण पोषक

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन मुंबई  : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि

Navneet Rana : भाजप नेत्या नवनीत राणांना अश्लील शिवीगाळ, पत्राद्वारे 'गँगरेप' आणि 'जीवे मारण्याची' धमकी; राजापेठ पोलिसांकडून तपास सुरू

अमरावती : भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा ( Navneet Rana) यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर