Stree 2 Collection : स्त्री २'ने रचला इतिहास! ठरला हिंदुस्तानातील सर्वोत्कृष्ट नंबर १ हिंदी चित्रपट

मुंबई : श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत असलेल्या ‘स्त्री-२’ (Stree 2) चित्रपटाचे चाहते प्रतिक्षेत होते. अखेर ६ वर्षानंतर १५ ऑगस्ट रोजी स्त्री २ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. चित्रपटगृहात प्रदर्शित होताच ‘स्त्री २’ने बॉक्स ऑफिसला (Box Office) पछाडून सोडलं. अजूनही श्रद्धा कपूरच्या हॉरर कॉमेडी सिनेमा ‘स्त्री २’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन काही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. या सिनेमाची दररोज कोट्यावधींची कमाई होत असून दररोज वेगवेगळे रेकॉर्ड बनत आहेत. अशातच महिन्याभरात या चित्रपटाने बॉलिवूडमधल्या सर्व चित्रपटांना मागे टाकून रेकॉर्ड तयार केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूडमध्ये 'स्त्री 2' चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या Maddock Films ने याला दुजोरा दिला आहे. या फिल्मसने एक्सवर चित्रपटाचा पोस्टर शेअर करत  'भारताच्या बॉक्स ऑफिसवरील पहिल्या क्रमांकाचा हिंदी चित्रपट' असे लिहले आहे. तसेच ''ती स्त्री आहे आणि तिने करुन दाखवले, हिंदुस्तानातील सर्वोत्कृष्ट नंबर 1 हिंदी चित्रपट'', असेही कॅप्शनमध्ये लिहले आहे.


त्याचबरोबर, आमच्यासह हा इतिहास रचण्यासाठी सर्वाच चाहत्यांची खूप सारे आभार. स्त्री २ अद्यापही चित्रपटगृहांमध्ये यशस्वीपणे सुरु आहे. चित्रपटगृहांमध्ये या, आणखी काही रेकॉर्ड्स रचूयात', असेही लिहले आहे.



'स्त्री २'ने आतापर्यंत किती कमावले?


आतापर्यंत स्त्री २'ने भारतीय बॉक्स ऑफिसवर ५८६ कोटी कमावले आहेत. तर यापुढे ६०० कोटी क्लबचे उद्घाटन करत आहे. दरम्यान, पाचव्या आठवड्यात चित्रपटाने शुक्रवारी ३.६० कोटी, शनिवारी ५.५५ कोटी, रविवारी ६.८५ कोटी, सोमवारी ३.१७ कोटी, मंगळवारी २.६५ कोटी कमावले.

Comments
Add Comment

साठाव्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी किंग खानची खास 'भेट'; गाजलेले चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

मुंबई: बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान १९९१ मध्ये दिल्लीहून मुंबईत आला आणि त्यानंतर तो थेट करोडो प्रेक्षकांच्या

सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सतीश शाह यांचे निधन

किडनीच्या आजाराने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास मुंबई: बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध

'क्योंकि सास भी कभी बहू थी' २ मध्ये झळकणार बिल गेट्स

मुंबई : २००० ते २००८ च्या कालावधीत घराघरात पोहोचलेली हिंदी मालिका म्हणजेच 'क्योंकि सास भी कभी बहू थी' ही मालिका आता

सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार?

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युप्रकरणाला आता तब्बल चार वर्षांहून अधिक काळ उलटला असला तरी या

रितेश देशमुखने शब्द पाळला; पाठपुरावा करुन मृत ज्युनियर आर्टिस्टच्या कुटुंबाला केली लाखमोलाची मदत!

मुंबई : 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान साताऱ्याजवळ कृष्णा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या सौरभ

The Ganeshutsav Podcast : 'The Ganeshutsav Podcast' (TGP) चा डंका! चिराग चंद्रकांत खिलारे यांनी जगातील पहिले 'हिंदू उत्सव' पॉडकास्ट सुरू करून मूर्तिकारांना दिले व्यासपीठ

मुंबई : भारतातील समृद्ध उत्सव संस्कृतीला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी १७ जुलै २०२४ रोजी 'TGP (The Ganeshutsav Podcast)' या विशेष