नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात; आयसीयूमध्ये दाखल, मुलगी निलोफरही जखमी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे जावई समीर खान (Sameer Khan) यांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी समीर खान यांच्या पत्नी आणि नवाब मलिक यांची मुलगी निलोफर या देखील सोबत होत्या. त्यांच्या हाताला देखील दुखापत झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे.


समीर खान आणि त्यांची पत्नी हे दोघे त्यांच्या घराजवळ असलेल्या क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये रेग्युलर चेकअपसाठी गेले होते. चेकअप झाल्यानंतर दोघेही बाहेर आले. यानंतर समीर यांनी ड्रायव्हरला गाडी घेऊन येण्यास सांगितले.


ते दोघे हॉस्पिटल बाहेर गाडीची वाट पहात होते. यावेळी ड्रायव्हरकडून गाडी आणताना चुकून ब्रेक ऐवजी एक्सलेटरवर पाय पडला आणि गाडी जोरात येऊन समीर खान यांना धडकली. यामध्ये समीर खान हे मल्टिफॅक्टर झाले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचे ऑपरेशन देखील पार पडले आहे. सध्या समीर आयसीयूमध्ये असून आणखी काही काळ अंडर ऑबजर्वेशन मध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

Diva-Chiplun Special MEMU Express : कोकणकरांसाठी खुशखबर; दिवा- चिपळूण विशेष मेमू एक्सप्रेस होणार सुरु

मुंबई : उन्हाळी सुट्टी सुरु झाली आहे कोकणकर आपल्या गावी जाण्यासाठी निघालेत. अनेक एक्सप्रेस गाड्या दादर, दिवा,

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाचा खेळ सुरुच; या राज्यांना उष्णतेसोबत अवकाळी पावसाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रातील हवामान विचित्र होत चालला आहे, कधी कडाक्याचं ऊन तर कधी पाऊस, ऋतुचक्र बिघडत आहे आणि याचा

BMC Hospitals : महानगरपालिकेच्या चार उपनगरीय रुग्णालयांमध्ये एम. आर. आय व सी.टी स्कॅनची सुविधा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील उपनगरीय रुग्णालयांमध्ये एम. आर. आय व सी.टी स्कॅन आदींच्या सुविधा देण्याची मागणी

Yamini Jadhav : महापालिका सभागृहात यामिनी जाधव कडाडल्या, मातोश्री दोन कुठल्या स्थायी समिती अध्यक्षांच्या काळात बनले

मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थापत्य शहर समिती अध्यक्ष यामिनी जाधव यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणा उबाठा आणि

Aarey Stalls : मुंबईतील सर्व आरेचे स्टॉल्स महापालिकेच्या ताब्यात घ्या,

मुंबई : मुंबईत आरेचे उत्पादन बंद आहेत, पण त्यांचे स्टॉल्स सुरु आहेत. आरेच्या दूध वितरणासाठी हे स्टॉल्स देण्यात

BMC News : महापालिकेच्या मुदत ठेवींच्या मुद्यावरून भाजपा नगरसेविकेने घेतला विरोधकांचा समाचार

मुंबई : मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींच्या मुद्यावरून भाजप नगरसेविका प्रिती सातम यांनी विरोधकांचा चांगलाच