Namo Bharat Rapid Rail: 'वंदे भारत' मेट्रो'चं नामांतरण 'नमो भारत रॅपिड रेल', रेल्वेचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : वंदे भारत मेट्रो ट्रेनच्या चाचण्या आता पूर्ण झाल्या असून, पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन देशाच्या सेवेत येण्यास सज्ज झाली आहे. पहिला मान याचा गुजरातला मिळाला आहे. दरम्यान, आता वंदे भारत मेट्रोचं नाव बदललं आहे. रेल्वेने आता वंदे भारत मेट्रोचे नाव बदलून 'नमो भारत रॅपिड रेल' असं केलं आहे. त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे गुजरातच्या जनतेला भेट देणार आहेत.


आज वंदे भारत मेट्रोच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नामकरणाचा सोहळा पार पडला. यानंतर वंदे भारत मेट्रो आता नमो भारत रॅपिड रेल अशी ओळखली जाईल. भारतात दररोज करोडो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. दरम्यान, नमो भारत रॅपिड रेलची गुजरातला आज भेट मिळत आहे. ही नमो भारत रॅपिड रेल गुजरातमधील भुज ते अहमदाबादपर्यंत धावणार आहे. आठवड्यातून ६ दिवस ही ट्रेन चालवली जाणार आहे.


नमो भारत रॅपिड रेलचे भाडे किमान ३० रुपये आहे. यामध्ये जीएसटीचाही समावेश करण्यात आला आहे. यासोबतच ५० किलोमीटरच्या प्रवासाला ६० रुपये इतके शुल्क लागणार आहे. नमो भारत रॅपिड रेलमध्ये मासिक पास वैध असणार आहे. साधारण मेल आणि एक्स्प्रेस ट्रेन किंवा पॅसेंजर ट्रेनसाठी जारी केलेले तिकीट या ट्रेनमध्ये चालणार नाही. यासाठी वेगळे एमएसटी तिकीट जारी केले जाईल. साप्ताहिक आणि मासिक तिकीट उपलब्ध असेल. प्रवाशांना सात दिवस, १५ दिवस, २० दिवसांच्या एकेरी प्रवासाचे शुल्क भरावे लागणार आहे.



पहिल्या नमो भारत रॅपिड रेलची वैशिष्ट्ये काय?


नमो भारत रॅपिड रेल ही वंदे भारत ट्रेनसारखीच असणार आहे. मात्र उपनगरीय मेट्रो प्रणालीची वैशिष्ट्ये आणि सोयी सुविधा या ट्रेनमध्ये देण्यात आल्या आहेत. दोन्ही बाजूला इंजिन तसेच स्वयंचलित दरवाजे या नमो भारत रॅपिड रेलमध्ये असणार आहेत. पहिली नमो भारत रॅपिड रेल १० डब्यांची असणार आहे. वंदे भारत आणि नमो भारत रॅपिड रेलमधील प्रमुख फरक हा आहे की, ही ट्रेन पूर्णपणे अनारक्षित असेल. ही ट्रेन सुटण्याच्या वेळेपूर्वी प्रवासी काउंटरवर तिकीट खरेदी करू शकतात. मंत्रालयाच्या चेन्नई येथील आयसीएफमध्ये नमो भारत रॅपिड रेलचे रेक रेल्वे बनवले आहेत.

Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या