बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते गणेश दर्शन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न
भिवंडी : भिवंडी शहरातील ओमकार मित्र मंडळ कोंबडपाडा, जयहिंद मित्र मंडळ पद्मानगर, सार्वजनिक गणेशोत्सव गणपती मंदिर, प्रभू आळी या मंडळांना महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते अनुक्रमे तीन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर रौप्य महोत्सवी, सुवर्ण महोत्सवी व अमृत महोत्सवी वर्ष साजरा करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांचा (Ganeshotsav) विशेष सन्मान करण्यात आला.
एकात्मतेचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धामणकर नाका मित्र मंडळ व स्वाभिमान सेवा संस्था आयोजित गणेश दर्शन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते पार पडला. या प्रसंगी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी रशीद, भाजपा शहराध्यक्ष अॅड हर्षल पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष राजू चौघुले यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी स्वाभिमान सेवा संस्थेचे संस्थाध्यक्ष संतोष शेट्टी यांच्यासह मंडळाच्या कार्याचे रवींद्र चव्हाण यांनी कौतुक केले.