मुंबई: डायबिटीजला सायलेंट किलर म्हटले जाते. यात टाईप १ आणि टाईप २ असतात. यापैकी अनेक लोकांना टाईप २ डायबिटीजचा त्रास असतो.
टाईप २ डायबिटीजमध्ये शरीराला इन्सुलिनचा फायदा तितकासा होत नाही आणि ब्लड शुगर सामान्यपेक्षा अधिक असते. डायबिटीजची समस्या जर वेळेत ठीक नाही झाली तर शरीराच्या इतर भागांवर याचा परिणाम होतो. डायबिटीज कमी करण्यासाठी तुमची लाईफस्टाईल आणि डाएट अतिशय गरजेचे आहे.
जर तुम्ही साखरेची पातळी अधिक आहे तर आम्ही तुम्हाला खास ड्रिंकबद्दल सांगत आहोत. याच्या सेवनाने तुम्ही ही आजार काही प्रमाणात कंट्रोल करू शकता. डायबिटीजची समस्या असल्यास दालचिनीचे सेवन करणे अधिक फायदेशीर मानले जाते. याच्या सेवनाने टाईप २ डायबिटीज कंट्रोल करण्यास मदत मिळते.
दालचिनी सतत खाल्ल्याने टाईप २ डायबिटीज अथवा प्री डायबिटीजच्या व्यक्तींमध्ये काही आठवड्यांपासून ते काही महिन्यांच्या आत वेगाने ब्लड शुगर कमी होण्यास मदत होते.
१ कप पाण्यात ४-५ इंच दालचिनीचा तुकडा तोडून टाका. हे पाणी अर्धे होईपर्यंत उकळा. त्यानंतर हे कोमट पाणी प्या.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी १ ग्लास कोमट पाण्यासोबत १ चमचा दालचिनी पावडरचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.
एक लीटर पाण्यात २ चमचे दालचिनी पावडर मिसळून चांगले उकळून घ्या. या पाण्याचे सेवन तुम्ही दिवसभर करू शकता.
एक ग्लास दुधात चिमूटभर दालचिनी पावडर मिसळा. यामुळे ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत होते.
मुंबई(ज्ञानेश सावंत): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ पावसामुळे मागच्या सामन्यात पंजाब कडून दारुण पराभूत झाला. सुरुवातीचे…
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…