Eid Holiday : ईद-ए-मिलाद सुट्टीच्या तारखेत बदल; सरकारचा मोठा निर्णय!

मुंबई : सोमवारी १६ सप्टेंबर रोजी मुस्लिम बांधवांचा 'ईद-ए-मिलाद' (Eid a Milad) हा सण साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी देशभरातील सर्व शैक्षणिक संस्थांसह सर्व सरकारी कार्यालये, न्यायालये, बँका आणि शाळांना सुट्टी (Holiday) असते. मात्र या सार्वजनिक सुट्टीबाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १५ सप्टेंबर रोजी रविवार आणि १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी अशा सलग तीन दिवस सुट्टी असल्यामुळे अनेकांनी बनवलेले हॉलिडेचे प्लॅनिंग काहीसे बिघडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


'ईद मिलाद उन- नबी' यासाठी राज्य सरकारने शासकीय सुट्टी जाहीर केली होती. मात्र १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी असल्याने दोन्ही सणांमध्ये शांतता आणि सलोखा कायम राहावा, यासाठी मुंबई शहर आणि उपनगरासह इतर जिल्ह्यांमध्ये मुस्लिमधर्मियांनी जुलूस काढण्याचा निर्णय १८ सप्टेंबर रोजी घेतला आहे. त्यामुळे १६ सप्टेंबर रोजी देण्यात येणारी शासकीय सुट्टी रद्द करून १८ सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र काढून निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती निमित्त सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी मुस्लीम समाज बांधवांनी १६ ऐवजी १९ सप्टेंबर रोजी मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासन आणि पोलीस यंत्रणांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

Kondhwa Search Operation : एटीएसचा कोंढव्यात शिरकाव! गल्लीबोळामध्ये झळकले आय लव मोहम्मदचे बॅनर, पोलीस तपास सुरू

पुणे : पुण्यातील कोंढवा (Kondhwa) परिसर आज पहाटेपासूनच तपास यंत्रणांच्या छापामारीमुळे चर्चेत आला आहे. तपास यंत्रणांची

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा