मुंबई: कोणत्याही देशात फिरण्याआधी तेथील ठिकाणांबाबत तुम्हाला संपूर्ण माहिती असणे गरजेचे असते यामुळे तेथे जाऊन तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. प्रत्येक देशामध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी काही कायदे-नियम असतात. आज आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगणार आहोत जिथे पर्यटकांसाठीचे कायदे अतिशय कडक आहेत. जर तुम्हीही या देशांत फिरण्याचा प्लान करत असाल तर तुम्हाला याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.
सिंगापूर – या यादीत सगळ्यात पहिले नाव सिंगापूरचे येते.येथे रस्त्यांवर थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, च्युईंगम खाणे यावर दंड आहे. सोबतच रस्ता पार करताना बेपर्वाई करणे, पब्लिक टॉयलेटचा वापर केल्यानंतर फ्लश न केल्यासही तुम्हाला मोठा दंड बसू शकतो.
संयुक्त अरब अमिरात – येथे सार्वजनिक ठिकाणी आपल्या जोडीदाराचा हात पकडणे आणि किस करणे बॅन आहे. यासाठी तुम्हाला तुरुंगातही जावे लागू शकते. येथे ड्रगचे नियमही अतिशय कडक आहेत.
सौदी अरेबिया – या देशात तुम्ही नशेशी संबंधित कोणत्याही गोष्टीसाठी पकडले गेलात तर तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाऊ शकते.
थायलंड – थायलंडमध्ये पर्यटकांसाठी कडक नियम आहेत. या देशात ड्रग्सबाबतीत अतियश कडक कायदे आहेत. तस्करींच्या प्रकरणांमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाऊ शकते.
जपान – जर तुम्ही जपान फिरण्याचा विचार करत असाल तर येथे सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो. या देशात धूम्रपानासाठी जागा बनवल्या आहेत. तुम्ही या जागांशिवाय इतर ठिकाणी स्मोकिंग करू शकत नाहीत.
कतार – या ठिकाणी जर तुम्ही फिरायला जात असाल तर येथील काही ठिकाणी दारूचे सेवन करणे