Mumbai News : मुलुंडमध्ये हिट अँड रन! भरधाव कारने दोघांना उडवले; एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

  98

मुलुंड : मुंबईत एकीकडे गणरायाचे आगमन होत असतानाच मुलुंडमध्ये (Mulund Accident) पहाटेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. हिट अँड रन (Hit And Run) प्रकरणाने मुंबईत आणखी एका तरुणाचा बळी घेतला आहे. मुलुंडमध्ये पहाटे एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बॅनर लावताना भरधाव बीएमडब्लू कारने दोन तरुणांना उडवलं. त्यातील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर एकाची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी बीएमडब्लू कारच्या चालकाला अटक करण्यात आलीय. या घटनेनंतर आरोपी हा नवी मुंबई येथे पळून गेला होता. मात्र पोलिसांनी आरोपीला अटक केली. दरम्यान या घटनेने गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी 'मुलुंडचा राजा' या गणेश मंडळावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे.



नेमके काय घडले?


पहाटे चारच्या सुमारास एका बीएमडबल्यू कारने मुलुंड पूर्वेकडील गव्हाणपाडा परिसरातील 'मुलुंडचा राजा' या मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना रस्त्यावर बॅनर लावत असताना जोरदार धडक दिली. या धडकेनंतर आरोपी कार चालक शक्ती हरविंदर मदतीसाठी न थांबता घटनास्थळावरुन पळ काढला. आरोपीने गाडी थेट मुलुंड पश्चिमेकडे जाणाऱ्या पूर्व-पश्चिम उड्डाणपूलावरून भरधाव वेगाने नेली. मात्र या जोरदार धडकेत प्रीतम थोरात या तरुणाचा मृत्यू झाला. तर प्रसाद पाटील हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पालिकेच्या वीर सावरकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कार चालकाचा शोध सुरु केला. आता या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. शक्ती हरविंदरने नुकतेच त्याची बीएमडबल्यू गाडी दुरुस्त केली होती. त्यामुळे ती व्यवस्थित काम करते की नाही हे पाहण्यासाठी त्याने परिसरात फिरवून बघत असताना अपघात झाला. पोलिसांनी ही अपघातग्रस्त कार मुलुंड कॉलनी येथून ताब्यात घेतली आहे.


अपघातानंतर आरोपीने गाडी घराजवळ लावून बाइकने नवी मुंबई गाठली. नवघर पोलिसांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आरोपीवर दाखल केला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे वेगवेगळे पथके तयार करण्यात आली होती. आरोपीला नवी मुंबईतील खारघर येथील मित्राच्या घरातून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, नवघर पोलिसांनी आरोपीचे रक्ताचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठवले आहेत.

Comments
Add Comment

डीनो मोरियाच्या ईडी चौकशीत सुशांत–दिशा हत्या प्रकरणाचे धागेदोरे उलगडणार?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया, एकेकाळचा बॉलीवूड अभिनेता आणि आज एक संशयित घोटाळेबाज! मुंबईच्या मीठी नदी

Azaan controversy: ‘अजान’वरून राजकारण? पोलिसांचे पाऊल कायद्याच्या चौकटीतच!

मुंबई : मुंबई पोलिसांनी अजानसाठी वापरल्या जाणाऱ्या लाऊडस्पीकर्सवर कारवाई सुरू केल्यानंतर काही मुस्लिम

महालक्ष्मी रेसकोर्सवर 'इव्हेंट जॅकपॉट' महापालिकेने कमावले तब्बल ७.५ कोटी!

मुंबई : मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवर बीएमसीने कमाईची 'रेस' लावली आहे. जुलै २०२४ पासून मुंबई महापालिकेने

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांची आयसीटीला १५१ कोटींची देणगी म्हणाले....

प्रतिनिधी: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) ला तब्बल

Apple WWDC News: नवा आयफोन घेताय मग थांबा....  नव्या खरेदीपूर्वी हे वाचा....

मुंबई: ॲपल डब्लूडब्लूडीसी (Apple WWDC) चा कार्यक्रम ९ जूनला कॅलिफोर्निया कलिफमध्ये होणार आहे. वर्षातील सर्वात मोठा

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या