Deepika-Ranveer Became Parents : गुड न्यूज! दीपवीरच्या घरी आला नवा पाहुणा; मुलगा की मुलगी?

  78

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) गेल्या काही दिवसांपासून प्रेग्नंट असल्यामुळे विशेष चर्चेत होती. दीपिकाचे पहिले अपत्य मुलगा होणार की, मुलगी हे जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. दीपिका सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देऊ शकते अशा चर्चा देखील सुरू होत्या. अशातच दीपिकाला काल मुंबईतील रिलायन्स फाउंडेशनच्या रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. अशातच गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सिंह कुटुंबीयांकडून आनंदाची बातमी मिळाली आहे. आज दीपिकाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे.


बॉलिवूडमधील कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) हे २०१८ साली लग्नबंधनात आले होते. मागील आठवड्यात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन जन्मापूर्वी आशीर्वाद घेण्यासाठी, जीवन बदलणाऱ्या या क्षणाची तयारी केली. त्यानंतर आज दीपवीर यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे, एका सुंदर मुलीचे स्वागत केले आहे. ऐन गणेशोत्सवातच गौराईचे आगमन झाल्यामुळे कुटुंबियांसह सर्व चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

कोकणातला जुना वाडा, नवी पिढी आणि ‘अंधार माया’ वेब सीरिजचा गूढ प्रवास

'अंधार माया' ही वेब सिरीज कोकणातील पारंपरिक वाडा, तिथली गूढता आणि पिढ्यानपिढ्यांच्या आठवणी याभोवती फिरते. खातू

Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या 'हेड ऑफ स्टेट' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज!

मुंबई : प्रियंका चोप्रा आज बॉलिवूडसह हॉलिवूडमधील लोकप्रिय चेहरा आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'हेड ऑफ

अभिनेता प्रथमेश परबच्या 'गाडी नंबर १७६०' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत धमाकेदार रहस्य आणि विनोदाची मेजवानी घेऊन येणाऱ्या 'गाडी नंबर १७६०' या

'सितारे जमीन पर’चा 'टायटल ट्रॅक' प्रदर्शित आमिर-जेनेलियाची नव्या रंगात 'केमिस्ट्री'

मुंबई : आमिर खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सितारे जमीन पर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकतंच या

'या' अभिनेत्रीने गुपचुप उरकले आपले लग्न, फोटो शेअर करत दिला चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत लग्नबंधनात अडकली हिना खान, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव Hina Khan ties the knot with boyfriend Rocky Jaiswal:

अभिनेता प्रथमेश परब पहिल्यांदाच बॉलिवूड सिनेमात मुख्य नायक म्हणून दिसणार

मुंबई : टाईमपास, दृश्यम, बालक पालक यांसारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये काम करत अभिनेता प्रथमेश परबने स्वतःची वेगळी