Subhadra Yojana : महिलांसाठी आणखी नवी योजना सुरु होणार; मिळणार दरवर्षी 'इतके' रुपये!

जाणून घ्या सविस्तर माहिती


मुंबई : देशभरातील महिला वर्गासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महिलांना (Women) आर्थिक पाठबळ देण्यासाठी राज्यभरात महिलांसाठी नवनवीन योजना सुरु आहेत. महिलांना सक्षम करण्यासाठी देखील विविध राज्यांमधील सरकारकडून महिलांना आर्थिक पाठबळ मिळत आहे. अशातच आता आणखी नवी योजना (New Scheme) सुरु करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरवर्षी १०हजार रुपये देण्यात येणार आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, ओडिसा सरकारने महिलांसाठी 'सुभद्रा योजना' (Subhadra Yojana) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत राज्यातील एक कोटी महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना ५ वर्षात ५० हजार रुपये दिले जाणार आहेत.



कोणत्या महिला योजनेसाठी पात्र?


सुभद्रा योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी महिलांचे वय २१ ते ६० वर्षे दरम्यान असावे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी मूळ ओडिशा राज्यातील असणेही आवश्यक आहे. ज्या महिलांच्या कुटुंबात कोणीतरी सरकारी नोकरी करत आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच ६० वर्षाच्या पुढच्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांच्या घरात आयकर भरणारे सदस्य आहेत त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर एखादी महिला आधीच राज्याच्या कोणत्याही योजनेंतर्गत लाभ घेत असेल. त्यानंतरही त्याला सुभद्रा योजनेचा लाभ दिला जाणार नाही.



कधीपासून होणार सुरु?


सुभद्रा योजना १७ सप्टेंबरपासून संपूर्ण राज्यात कार्यान्वित होणार आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकार महिलांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे हप्ते वर्षातून दोन वेळा देणार आहे. पहिला हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दिला जाईल, तर दुसरा हप्ता रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांच्या खात्यावर पाठवला जाईल.



असा करा अर्ज 


सुभद्रा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना अंगणवाडी केंद्र किंवा ब्लॉक ऑफिस किंवा मो-सेवा केंद्र आणि जनसेवा केंद्रातून फॉर्म गोळा करावा लागेल. महिलांना योजनेसाठी अर्ज करण्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागणार नाहीत. योजनेचा फॉर्म भरून संबंधित कागदपत्रांसह अंगणवाडी केंद्र किंवा ब्लॉक ऑफिसमध्ये जमा करावा लागेल

Comments
Add Comment

Plastic Waste : भारतापुढे दररोज १९ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन

UP Crime News : प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला अन् प्रियकराने मित्रांसोबत मिळून रचला भयानक खेळ; उत्तर प्रदेश हादरले!

उत्तर प्रदेश : विश्वासाला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर

Robot Waiter Murthal : मुरथलच्या धाब्यावर रोबोट वेटरची एन्ट्री! हरियाणातील 'रेशम धाब्या'चा भन्नाट प्रयोग, व्हिडिओ व्हायरल

मुरथल : हरियाणातील मुरथल हे ठिकाण आपल्या चविष्ट आणि गरमागरम पराठ्यांसाठी तसेच पारंपरिक चवीसाठी देशभरात

Shahzad Bhatti Network : केंद्र सरकारची मोठी कारवाई : ISI समर्थित ‘शहजाद भट्टी नेटवर्क’चा पर्दाफाश; १४ राज्यांतून २५३ जण ताब्यात

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश केल्याचा दावा केंद्र

Smriti Irani News : भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महिलांना मोठं स्थान; स्मृती इराणींचे मुख्य संघटनेत दणकेबाज कमबॅक!

नवी दिल्ली : आगामी राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या नव्या

Lakshmanan Meyyappan Youngest CA : अवघ्या १६ व्या वर्षी कमाल! लक्ष्मणन मेय्यप्पन ठरला जगातील सर्वात तरुण 'चार्टर्ड अकाउंटंट'

दुबई : वयाच्या सोळाव्या वर्षी जिथे बहुतेक तरुण आपल्या भविष्याची आणि करिअरची दिशा शोधत असतात, तिथे एका भारतीय