मुंबई : श्रीगणेश चतुर्थी दरवर्षीप्रमाणे शनिवार, ७ सप्टेंबर रोजी भाद्रपद शु. चतुर्थीच्या दिवशी सर्वत्र साजरी केली जाणार आहे. या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:५० ते दुपारी १:५१ पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना व पूजन (Ganesh Festival) करता येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना मध्याह्नानंतर देखील करता येऊ शकतात, अशी माहिती पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.
दरम्यान, मंगळवार १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. हा गणेश स्थापनेपासून ११ वा दिवस असल्याने ज्यांच्याकडे अनंत चतुर्दशीचे दिवशी विसर्जन केले जाते, त्यांच्याकडे ११ दिवसांचा उत्सव असेल. तसेच या दिवशी मंगळवार म्हणजे गणेशाचा वार असला तरीही परंपरेप्रमाणे विसर्जन करावे असेही दाते यांनी सांगितले.
दरम्यान, विसर्जनाच्या वेळेस गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत असतो, त्याप्रमाणे पुढच्या वर्षी गणपती बाप्पा खरंच लवकर म्हणजे २७ ऑगस्ट २०२५ रोजी येणार आहेत, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहे.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…