पुणे : गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) काळात मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच मेट्रोच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात येणार आहे. मेट्रोच्या या सेवेमुळे शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्याची शक्यता आहे. शहरातील गणेशोत्सवातील सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी बाहेरून नागरिक मोठ्या संख्येने पुण्यात येत असतात. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांच्या सुविधेसाठी मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मेट्रोची सेवा मध्यरात्री पर्यंत सुरू राहणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी (१७ सप्टेंबर) ते १८ सप्टेंबर (बुधवार) रोजी सकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत असे एकूण २४ तास मेट्रोची सेवा अखंड सुरू राहणार आहे. शनिवार (७ सप्टेंबर) ते सोमवार (९ सप्टेंबर) या दोन दिवसात मेट्रो सकाळी सहा ते रात्री अकरा पर्यंत सुरू राहील. तर, मंगळवार (१० सप्टेंबर) ते सोमवार (१६ सप्टेंबर) या कालावधीत सकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली.
अखंड ४० तास मिळणार सेवा
अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी (१८ सप्टेंबर) सकाळी सहा ते रात्री दहा अशी नियमित सेवा सुरू राहणार आहे. अनंत चतुर्दशी आणि दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर दोन दिवसात मेट्रोची अखंड चाळीस तास सेवा सुरू असेल. मेट्रोच्या या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…