Narendra Modi : नरेंद्र मोदी पोहोचले मशिदी पाहायला ब्रुनेईमध्ये, मशिदीची खासियत काय? जाणून घ्या....

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय ब्रुनेई दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी मंगळवारी ब्रुनेईची राजधानी बंदर सेरी बागवान येथे पोहोचले. दरम्यान, ब्रुनेई दौरा हा नरेंद्र मोदींचा खूप खास असल्याचे म्हंटल जात आहे.



भारतीय पंतप्रधानांनी ब्रुनेईला दिलेली ही प्रथमच भेट आहे. नरेंद्र मोदींनी दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना ४० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ब्रुनेईमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केलं आहे.



नरेंद्र मोदींनी दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांचे प्रतीक म्हणून उच्चायुक्तालयाचा उल्लेख केला. तसेच, याच्यामुळे अनिवासी भारतीयांची सेवा होईल. उच्चायुक्तालयाची इमारत कोटा दगडांनी बनलेली भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा दर्शवते, असे नरेंद्र मोदी म्हणाले.



त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी राजधानीतील उमर अली सैफुद्दीन मशिदीत पोहोचले. ब्रुनेईच्या उमर अली सैफुद्दीन मशीद हे दोन राष्ट्रीय मशिदींपैकी एक आहे. यासोबत, ही ब्रुनेईचे राष्ट्रीय चिन्ह देखील आहे. देशातील सर्वात मोठ्या आणि जुन्या मशिदींपैकी ही मशीद आहे.




उमर अली सैफुद्दीन तृतीय यांच्या नावावरून या मशिदीचे नाव ठेवण्यात आले आहे. जे ब्रुनेईचे २८ वे सुलतान आणि सध्याचे सम्राट सुलतान हसनल बोल्किया यांचे वडील होते. देशातील इस्लामिक श्रद्धेचे प्रतीक म्हणून मानलं जाते.



मलेशियन आर्किटेक्चर फर्म बूटी एडवर्ड्स अँड पार्टनर्सने ही मशीद बांधली होती. या मशिदीच्या बांधकामात ७०० टन स्टील आणि १५०० टन काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे. तसेच, मशिदीचा पाया ८०-१२ फूट खोल आहे.



ब्रुनेईतील या मशिदीचे उद्घाटन सुलतान उमर अली सैफुद्दीन तृतीय यांच्या ४२ व्या वाढदिवसादरम्यान १९५८ मध्ये करण्यात आले होते. भारतीय मुघल साम्राज्याशी मिळती-जुळती अशी मशिदीची रचना आहे.



दरवर्षी लाखो पर्यटक मशीद पाहण्यासाठी येतात. मशिदीच्या आकाराबद्दल बोलायचं तर ते ६९X२४ मीटर आहे. ३ हजार भाविक मशिदी एकत्र बसू शकतात. मशिदीची कमाल उंची १७१ फूट असून घुमट सोन्याने मढवलेला आहे.






Comments
Add Comment

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी घेतला वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच रविवार २८ डिसेंबर २०२५ रोजी १२९ व्या 'मन की बात'

स्मशानभूमीत जळत्या चितेशेजारी मुलांचा अभ्यास

अनोख्या शाळेची देशभरात चर्चा बिहार : सर्वसाधारणपणे शाळा म्हटलं की वर्ग येतात, कॅन्टीन असतं, मुलांना खेळायला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून भाजप, आरएसएसचे कौतुक!

जुना फोटो शेअर करत म्हणाले, ‘हीच संघटनेची शक्ती…’ नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार

देशात मल्टी-डोअर न्यायालये असावीत, विवादांची सुनावणी नको, ते सोडवावेत

गोव्यात 'मध्यस्थी' विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न पणजी : मध्यस्थता कायद्याच्या दुर्बळतेचे लक्षण नाही, तर तो

रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल; आधार लिंक अनिवार्य

सणासुदीच्या काळात दलालांच्या गैरप्रकारांना आळा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची कन्फर्म तिकिटे मिळवणे म्हणजे जणू