Ganeshotsav 2024 : परदेशी पाहुण्यांना पेणच्या गणेश मूर्तीचे आकर्षण

पेणच्या दीपक कला केंद्रात थायलंड च्या गणेशभक्ताची भेट


देवा पेरवी


पेण : हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्याच्या अगोदर गणपतीचे म्हणजे श्री गणेशाचे पूजन (Ganeshotsav 2024) केले जाते. एकूणच हिंदू धर्मामध्ये गणपतीला सर्व देवतांपेक्षा अग्रतेचे स्थान दिले गेले आहे. गणपती हा आपला देव आपल्याला संकटाशी लढण्यासाठी बळ देऊन, सर्व समस्या पासून आपले रक्षण करतो. कला निर्मिती क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या पेण तालुक्याला नुकतेच थायलंड चे गणेश भक्त थेट पेण शहरातील दीपक समेळ या कला केंद्रात गणेशमूर्ती खरेदीसाठी आले होते. संपुर्ण जगभरात अवघ्या दोन दिवसावर गणपतीचे आगमन होत असल्याने गणेशमूर्तीच्या माहेर घरात कारखानदार व कारागीर याची लगबग जोरात सुरू आहे.



अवघ्या दोन दिवसावर गणपतीचे आगमन होत असल्याने अनेक जगभरातसह अनेक राज्यातुन गणपती खरेदी करण्यासाठी गणेशमूर्तीच्या माहेर घरात येत असतात. काही दिवसांवर बाप्पाचे आगमन होत असल्याने शहरातील अनेक दुकाने गणेशोत्सवासाठी फुलून निघाले आहेत. तर तालुक्यातील अंतोरे, दादर, जोहे, कळवे, तांबडशेत, हमरापूर, वडखळ, दादर, बोरी, शिर्की, उंबर्डे, कोप्रोली यासह शहरातील कासार आळी, गुरवआळी, फणसडोंगरी, नवीन वसाहत, कुंभारआळी, गांगळ आळी, नंदिमाल नाका, उत्कर्ष नगर येथे देखील पुर्वीपासून असणारे गणपती कारखाने दिवस-रात्र सुरू असून या कारखान्यांमधील कारागीर मुर्तींवर रंगकाम, दागिन्यांची सजावट, डोळे आखणी यावर अखरेचा हात फिरवण्यासाठी मग्न झाले असून याही वर्षी बाप्पाच्या माहेघर येथून थायलंड, अमेरिका, इंग्लड, ऑस्ट्रेलिया मॉरिशससह इतर राज्यात जवळपास ५० ते ६० हजार गणेश मुर्त्या रवाना करण्यात आल्या आहेत.



संपुर्ण जगात पेणच्या गणेश मूर्तीची ओळख आहे. त्यामुळे देश विदेशातुन पेणच्या गणेशमूर्ती मागणी असते कारण पेणच्या गणेश मुर्तीची रंगरंगोटी सूंदर असून डोळ्यांची आखणी जशी तशी असल्याने व दागिन्यांची सजावट सूंदर असल्याने पेणच्या गणेश मूर्तींचे थायलंडसह इतर देशातील गणेश भक्तांना आकर्षन होत आहे. त्यामुळे थायलंड च्या गणेश भक्तांनी पेणच्या दिपक कला केंद्राला भेट देताच मूर्ती पाहून भारावून गेले आहेत.




 

पेणच्या मूर्ती जगभरात प्रसिद्ध असल्याने आम्ही सुध्दा पेणच्या गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी पेण च्या दीपक कला केंद्रात भेट दिली. परंतु कोरोना काळानंतर या विविध प्रकारच्या गणेश मूर्ती पाहून आम्ही सुध्दा भारावून गेलो. - थायलंड, गणेश भक्त



पेणच्या गणेशमूर्ती संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. भारतासह हा सण परदेशातही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पेणची गणेशमूर्ती ही दिसायला आणि रंगरंगोटीने सुंदर असून डोळ्यांची आखणी आणि दागिन्यांची सजावट देखील तितकीच सुंदर असते. त्यामुळे सदरच्या मूर्ती गणेश भक्तांना आकर्षक करतात त्यामुळे परदेशातुन गणेश मूर्ती खरेदीसाठी येत असतात. - निलेश समेळ, दिपक कला केंद्र, पेण, मालक

Comments
Add Comment

खेड - मंडणगड मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

खेड : खेड–मंडणगड मार्गावर एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा

KGF २ च्या असिस्टंट डायरेक्टरवर कोसळला दुःखाचा डोंगर; कीर्तन नादगौडांचा साडेचार वर्षीय मुलगा अपघातात दगावला

बंगळुरू : घरात लहान मूल असताना क्षणभराचे दुर्लक्षही किती मोठी किंमत मोजायला लावू शकते, याचा हृदयद्रावक अनुभव

नितीश कुमारांनी हिजाब ओढल्याचा व्हिडीओ व्हायरल; महिलेने २४ तासातच घेतला टोकाचा निर्णय

पटना : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या एका कृतीमुळे सुरू झालेला वाद आता गंभीर वळणावर पोहोचला आहे. सरकारी

एसीएमई सोलारने ४७२५ कोटी रुपयांचे वित्तपुरवठा मिळवला

गुरूग्राम: एसीएमई सोलार होल्डिंग्ज लिमिटेड (एसीएमई सोलार) या अक्षय उर्जा (Renewable Energy) आपल्या नव्या विस्तारासाठी व

मेस्सीच्या कार्यक्रमामध्ये झालेल्या गोंधळाची चौकशी एसआयटीकडे; अटकेची संख्या ६ वर

कोलकाता: अवघ्या फुटबॉल विश्वाला आपल्या कवेत घेऊन फिरणारा अर्जेंटिनाचा विश्वविजेता फुटबॉल कर्णधार लिओनेल मेसी

ठेकेदाराला हलगर्जीपणा नडला, रंगकाम करताना कोसळून मजूराचा जागीच मृत्यू

पुणे: पुण्यात कामाच्या ठिकाणी मजुरांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे एका कंत्राटदाराला चांगलेच महागात पडले