Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘ब्रॉन्कायटीस’चा त्रास; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला!

  185

राष्ट्रपतींच्या उदगीर येथील कार्यक्रमाला अनुपस्थिती‌


मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना ‘ब्रॉन्कायटीस’चा त्रास होत असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. यामुळे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांना उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहू शकणार नाहीत. याबाबत राष्ट्रपती महोदयांच्या कार्यालयाला अवगत करण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार हे मागील काही महिन्यांपासून जनसन्मान यात्रा, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांची भेट, शासकीय बैठका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने सातत्याने राज्यातील विविध भागांचा दौरा करत आहेत. आज त्यांचा राष्ट्रपती महोदयांसोबत उदगीरचा दौरा होता. परंतु ‘ब्रॉन्कायटीस’चे निदान झाल्याने उपमुख्यमंत्र्यांना त्यांचा उदगीर दौरा रद्द करावा लागत आहे. प्रकृतीत सुधारणा होताच ते लवकरच पुन्हा दौरे सुरु करतील. दरम्यानच्या काळात मुंबईतील शासकीय निवासस्थान येथून शासकीय कामकाज पाहणार आहेत, असेही उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने कळविले आहे.

Comments
Add Comment

राज्यात पावसाचा हाहाकार, मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट; शाळांना सुट्टी

मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यात हाहाकार माजला आहे. मुंबईसह कोकण,

श्रीगोंद्यात महिलेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न !

श्रीगोंदा : सुरोडी (ता. श्रीगोंदा) येथील मिनाक्षी रामदास सकट (वय ३८ ) यांच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

तानसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पालघर : पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचे जलस्रोत असलेल्या तानसा धरणाचे पाणी पातळी पूर्ण क्षमतेला पोहोचल्यामुळे आज

भाटघर धरणातून ३०५० क्युसेकने विसर्ग , नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भोर : पुण्यातील भोर येथे असलेले ब्रिटिशकालीन भाटघर धरण (येसाजी कंक जलाशय) दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास १००

दापोलीत मुसळधार पाऊस, मुरुडमध्ये पाणी भरलं, 20 ते 25 घरांचा संपर्क तुटला, खेड दापोली रस्ता बंद

दापोली शहरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पाणी साचण्याची स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील नाले

नांदेड जिल्ह्यात रावणगावचे ग्रामस्थ गाढ झोपेत असताना आभाळ फाटलं

नांदेड : मराठवाड्याच्या काही भागांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.