ST Worker Strike : लालपरी ठप्प! प्रवाशी संतापले

मुंबई : 'बहुजन सुखाय, बहुजन हिताय' असे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाचा गलथान कारभार नेहमीच सुरु असतो. कायम तोट्यात चालणाऱ्या एसटीला गणपती, दिवाळी आणि होळी सारख्या सणाच्या वेळेला आर्थिक उत्पन्न मिळवण्याची संधी असताना नेमके त्याचवेळी एसटीचे कर्मचारी संपासारखे हत्यार उपासून प्रवाशांना वेठीस धरतात. आताही एसटी कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता संप पुकारल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तुम्हाला मुलं-बाळं आहेत आणि आमची मुलं-बाळं आज पहाटेपासून रस्त्यावर रडत आहेत. आयाबहीणी आणि वृद्धांची देखील मोठी गैरसोय होत आहे. यामुळे सामानसुमान आणि परिवारासह गावाकडे निघालेले चाकरमानी चांगलेच संतापले आहेत.


राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे त्याचबरोबर मागील आठ वर्षांपासूनच्या थकीत महागाई भत्ता, घर भाडे भत्ता नक्कीच, व वार्षिक वेतन वाढ करावी अशा प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका (ST Worker Strike) धारण केली आहे. आज सकाळपासूनच एसटी कर्मचारी संघटनेकडून संपाची हाक दिली आहे. अनेक जिल्ह्यातील डेपो मधून एसटी फेऱ्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्यामुळे बाप्पाच्या आगमनासाठी निघालेल्या चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.


एकीकडे 'प्रवाशांचे होणाऱ्या हालामुळे आम्ही माफी मागतो. परंतु आम्हालाही मुलंबाळं आहेत. आमच्या घरी देखील सण आहेत. परंतु कमी वेतन आणि सरकारकडे केल्या जाणाऱ्या मागण्या अपूर्ण असल्यामुळे आमचेही हाल होत आहेत', असे म्हणत एसटी कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे. तर दुसरीकडे एसटी बसचे आरक्षण करुनही प्रवाशांचा खोळंबा होत आहे. एसटी महामंडळ आणि कर्मचाऱ्यांच्या या भांडणात सर्वसामान्यांना वेठीस धरण्यात येत असल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.



प्रवाशांचे म्हणणे काय?


राज्यभरात या आंदोलनाचा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. डेपोमध्ये साडे सातची एसटी बस होती. मात्र दोन-अडीच तास होऊनही बस निघत नसल्यामुळे प्रवाशी संतापले असता कर्मचाऱ्यांकडून ही बस कुठेही जाणार नाही, असे प्रवाशांना सांगण्यात आले. त्यामुळे प्रवाशांमध्येही संताप व्यक्त होत आहे. आम्ही मुलाबाळांसह सकाळपासून इथे उभे आहोत. दोन-तीन महिन्यांआधी रिजर्वेशन करुनही एसटीचा पत्ता नाही. एसटी मंडळाकडून आंदोलनाबाबत कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही. गणपतीची पूर्व तयारी करण्यासाठी गावाकडे जायचे आहे. परंतु सर्व खासगी गाड्यांसह रेल्वे आरक्षण देखील भरले आहे. त्यामुळे आता आम्ही गावी कसे जायचे, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्यांना वेठीस धरण्यात येत असल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केल्या जात आहेत.


एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शाळकरी मुलांचे देखील मोठे हाल झाले आहेत. वस्तीसाठी गेलेल्या बसने प्रवाशी विद्यार्थी शहरात आले असून माघारी जाण्यासाठी बसफेरी नसल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीने संप मिटवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Comments
Add Comment

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह