Friday, May 9, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

Paralympics 2024: भारताच्या खात्यात दुसरे सुवर्णपदक, आतापर्यंत ९ पदकांची कमाई

Paralympics 2024: भारताच्या खात्यात दुसरे सुवर्णपदक, आतापर्यंत ९ पदकांची कमाई

मुंबई: नितेश कुमारने पॅराऑलिम्पिक २०२४मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने बॅडमिंटनच्या पुरुष एकेरी एसएल३ कॅटेगरीमध्ये ग्रेट ब्रिटनच्या डेनियल बॅथेलला २१-१४, १८-२१, २३-२१ असे हरवत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. आतापर्यंत भारताने एकूण ९ पदकांची कमाई केली आहे.


नितेशने पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्याने पहिल्याच प्रयत्नात सुवर्णपदक मिळवत इतिहास रचला. तो आता पॅराऑलिम्पिकच्या बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा केवळ तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये प्रमोद भगत आणि कृष्णा नागर यांनी पुरुषांच्या एकेरी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.



भारताच्या खात्यात ९वे पदक


भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत ९वे पदक मिळवले आहे. सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत नितेश कुमार बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. नेमबाजीत आतापर्यंत ४ पदके मिळाली आहेत. अॅथलेटिक्समध्येही भारताला ४ पदके मिळाली आहेत.

Comments
Add Comment