Wednesday, March 26, 2025
HomeदेशLPG Price: आजपासून महागले सिलेंडरचे दर, दिल्लीपासून मुंबईपर्यंत वाढले इतके दर

LPG Price: आजपासून महागले सिलेंडरचे दर, दिल्लीपासून मुंबईपर्यंत वाढले इतके दर

मुंबई: आजपासून सप्टेंबर महिन्याची सुरूवात झाली आहे. १ सप्टेंबर २०२४ला सकाळी-सकाळी महागाईला जोरदार झटका आहे. ऑगस्टनंतर पुन्हा एकदा सप्टेंबरमध्ये ऑईल मार्केटिंग कंपनीमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान यावेळेस १९ किलोग्रॅमच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. तर १४ किलो घरगुती गॅस सिलेंडरचे दर जैसे थेच आहे. रविवारी पहिल्या तारखेपासून दिल्लीमध्ये कमर्शियल गॅसच्या दरात ३९ रूपयांची वाढ झाली आहे.

दिल्लीपासून मुंबईपर्यंत वाढले इतके दर

IOCL च्या वेबसाईटच्या माहितीनुसार दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत गॅस सिलेंडर १ सप्टेंबर २०२४ ला सकाळी ६ वाजल्यापासून लागू करण्यात आले आहेत. ताज्या बदलानुसार आता राजधानी दिल्लीत १९ किलो एलपीजी सिलेंडरचे दर १६५२.५० रूपयांनी वाढून १६९१.५० रूपये झाले आहे. कोलकाताबद्दल बोलायचे झाल्यास कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर १७६४.५० रूपयांनी वाढून आता १८०२.५० रूपये झाले आहे. येथे ३८ रूपयांनी महाग झाले आहेत.

इतर शहरांबद्दल बोलायचे झाल्यास मुंबईत १९ किलोच्या या सिलेंडरची किंमत १ सप्टेंबरपासून वाढून १६४४ रूपये झाले आहे. तर ऑगस्टमध्ये ७ रूपये वाढून १६०५ रूपये झाली होती. या वाढीत सलग दसऱ्या महिन्यात वाढ केली आहे. याशिवाय चेन्नईमध्ये एलपीजी सिलेंडरचे दर वाढले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -