Shriyut Non Maharashtrian : नोकरी भरतीमधील भ्रष्टाचार! थेट भाष्य करणार ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’

'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला


मुंबई : मराठी माणूस म्हटल की तो रिस्क घेऊन उद्योग करण्यापेक्षा नोकरी करण्यामध्ये समाधान मानणारा आहे. आपल्या सभोवताली अनेक बेरोजगार तरूण स्वतःचा छोटा, मोठा व्यावसाय सुरू करण्याचा प्रयत्न न करता नोकरी शोधण्याच्या मागे लागलेले दिसतात. अगदी हातावर मोजण्या इतक्या नोकरीच्या जागांसाठी हजारोंच्या घरात अर्ज येतात हे समाजातील भयान वास्तव आहे. त्यातच नोकरभरातीतील भ्रष्टाचार आणि पेपरफूटी प्रकरण तर नोकरीच्या शोधात असलेल्या प्रत्येक उमेदवारांच्या प्रवासातील मोठे अडथळे ठरत आहेत. याच गंभीर विषयाला वाचा फोडणारा 'श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन' (Shriyut Non Maharashtrian) हा मराठी चित्रपट (Marathi Cinema) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत असून या चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर सोशल मिडियावर प्रदर्शित झाला आहे.


उत्तेजना स्टूडिओज प्रा. लि. निर्मित 'श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन' या चित्रपटात जनक सिंह आणि समीर रंधवे हे दोघे झुंजारू उद्योजक आहेत. त्यांच्या कॅफेच्या शाखा विस्तारण्यासाठी ते एका गुंतवणूकदाराच्या शोधत असतात. जनकच्या सभ्य व्यक्तिमत्वामध्ये आणखी एक पैलू दडलेला आहे, तो रात्रीच्या अंधारात ए. के. नावाच्या गुन्हेगाराचा शोध घेत आहे. त्याला पकडायला जनक सिंह कुठल्याही थरापर्यंत जाण्यास तयार आहे. तर कोण आहे ए. के ? जनक त्याला का शोधतोय ? आणि त्यांचा काय संबंध आहे ? या सर्व प्रश्नांची उकल या चित्रपटातून होणार आहे.


चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक अजिंक्य उपासनी म्हणाले, आम्ही मराठी माणसांसाठी एका मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. मराठी माणसे दिवाळी, ख्रिसमस अशा वेळेस हिंदी किंवा अन्य चित्रपट बघत असतात. यंदा आम्ही खास मराठी प्रेक्षकांसाठी गणेशोत्सवात मराठी चित्रपट घेऊन येत आहोत. मराठी माणसांनी मराठी सण - उत्सवाला मराठी चित्रपट पहावेत, असे आवाहनही त्यांनी केले.


डॉ. पार्थसारथी आणि प्रेरणा उपासनी यांनी 'श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात अभिनेता गौरव उपासनी, अथर्व देशपांडे, वैभव रंधवे, सायली वैद्य, संपदा गायकवाड आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन, छायांकन, संकलन, पटकथा अशी तिहेरी जबाबदारी अजिंक्य उपासनी यांनी लीलया पेलली आहे. चित्रपटाची कथा गौरव उपासनी यांची असून या चित्रपटासाठी संवाद लेखनही त्यांनी केले आहे. तर या चित्रपटाला संगीत व पार्श्वसंगीत सुमेध मिरजी यांचे लाभले आहे. या चित्रपटाचे वितरण रूपम एंटरटेनमेंट करत आहेत. नोकर भरतीतील भ्रष्टाचारावर भाष्य करणारा सस्पेन्स थ्रीलर 'श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन' हा मराठी चित्रपट येत्या ६ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

मत्स्यव्यवसाय संस्थांच्या नोंदणीला स्थगिती - मंत्री नितेश राणेंची नागपुरात मोठी घोषणा; मच्छीमार बांधवांच्या वतीने भव्य सत्कार

नागपूर : राज्यातील भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी दि. १२ मे २०२३ च्या शासन निर्णयाला

लाडक्या बहिणींना 'ई-केवायसी' दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी

मंत्री अदिती तटकरे; ३१ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक नागपूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण

बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिंदे सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'; गृहनिर्माण क्षेत्रात ऐतिहासिक निर्णय, लाखो मुंबईकरांना मोठा दिलासा

नागपूर : "मुंबईबाहेर गेलेला चाकरमानी पुन्हा मुंबईत परतला पाहिजे, हीच स्व. बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती आणि ती

मुख्य सचिवांवर हक्कभंग आणणार, विधानसभा अध्यक्षांचा इशारा

नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपत आले, तरी आमदारांनी मांडलेल्या अनेक लक्षवेधींना अद्याप उत्तरे

मुंबईत फनेल झोनमुळे रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा ; पुनर्विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाची नवीन योजना

नागपूर : मुंबईतील फनेल झोनमुळे रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाने तयार केलेल्या

सिडकोच्या घरांच्या किमतीत १० टक्के कपात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत घोषणा, १७ हजार घरांची लॉटरी लवकरच नागपूर : नवी मुंबईतील सिडकोच्या