Delhi Rains: मुसळधार पावसामुळे राजधानी दिल्लीत पाणीच पाणी

नवी दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद, ग्रेटर नोएडासह एनसीआरमधील अनेक भागांमध्ये पाणी भरल्याची स्थिती आहे. दिल्ली-एनसीआरमधील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याची दृश्ये समोर आली आहेत. यामुळे गाड्यांचा वेग मंदावला असून बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक जामची स्थिती निर्माण झाली आहे.



३१ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा


हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा बनत आहे. यामुळे दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, हिमाचल आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये २९ ऑगस्टलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने ३१ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.



पाणी भरल्याने ट्रॅफिक जाम


अनेक ठिकाणी पाणी भरल्याने सकाळी सकाळी कामावर जाणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. दिल्लीच्या घौला कुआं, एम्स चौराहा, मूलचंद चौराहा, आयआयओ, दिल्ली कँट, द्वारका सेक्टर १३, ८ आणि १९ चौराहा, महिलापालपूर-द्वारका अंडरपाससह अनेक भागांमध्ये ट्रॅफिक जाममुळे गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Comments
Add Comment

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या

Monsoon in Andaman 2026 : आला रे आला...अंदमान-निकोबारमध्ये पावसाची हजेरी, केरळ आणि कोकणात कधी धडकणार ?

संपूर्ण देशातील नागरिक आणि विशेषतः शेतकरी राजा ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तो मान्सून अखेर अंदमानच्या  (Andaman)

Fake News Alert! : अफवांवर विश्वास ठेवू नका! राज्यात 'कॅब' सेवा सुरूच राहणार; 'डीजीआयपीआर'ने सांगितले सत्य!

सध्या सोशल मीडियावर ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) यांसारख्या लोकप्रिय कॅब सेवा महाराष्ट्रात कायमच्या बंद झाल्या