मुंबई: महिला टी-२० वर्ल्डकप २०२४चे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पाकिस्तानशी दुबईत सामना रंगणार आहे.
भारतीय महिला संघ आणि पाकिस्तान यांच्यात ६ ऑक्टोबरला हा सामना रंगणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना दुबईत खेळवला जाईल. याआधी भारतीय संघ २ वॉर्मअप सामने खेळणार आहे. स्पर्धेचे आयोजन ३ ऑक्टोबरला होईल.
स्पर्धेसाठी दोन ग्रुप बनवण्यात आले आहेत. ग्रुप ए मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेला ठेवण्यात आले आहे. तर ग्रुप बीमध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांग्लादेश आणि स्कॉटलंडला ठेवण्यात आले आहे.
महिला टी-२० वर्ल्डक २०२४चा पहिला सामना बांग्लादेश आणि स्कॉटलंड यांच्यात खेळवला जाईल. हा सामना शारजाहमध्ये ३ ऑक्टोबरला खेळवला जाईल. यानंतर दुसरा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळवला जाईल. हा सामना ३ ऑक्टोबरलाच होईल.
भारत-पाकिस्तान सामना
टीम इंडियाचा पहिला सामना न्यूझीलंडशी रंगणार आहे. हा सामना ४ ऑक्टोबरला खेळवला जाईल. तर दुसरा सामना पाकिस्तानशी होईल. हा सामना ६ ऑक्टोबरला होईल. भारत आणि श्रीलंका यांच्यात ९ ऑक्टोबरला सामना रंगेल. टीम इंडियाचा चौथा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध शारजामध्ये रंगेल. हा सामना १३ ऑक्टोबरला खेळवला जाईल.
२० ऑक्टोबरला रंगणार फायनल
स्पर्धेत एकूण २३ सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक टीमचे चार ग्रुप सामने खेळवले जातील. या सामन्यांआधी एकूण १० वॉर्मअप सामने खेळवले जातील. या वर्ल्डकपचा पहिला सेमीफायनल सामना १७ ऑक्टोबरला रंगेल तर दुसरा सेमीफायनल सामना १८ ऑक्टोबरला रंगेल. यानंतर फायनल सामना २० ऑक्टोबरला दुबईत खेळवला जाईल.