मुंबई: हिंदू धर्मातील मान्यतेनुसार घरात तुळशीचे रोप लावणे अतिशय शुभ असते. ज्या घरात तुळशीचे रोप लावलेले असते आणि नियमितपणे त्याची पुजा होते तेथे नेहमी आनंद राहतो.
घरात तुळशीचे रोप असल्यास सुख-शांती राहते. सोबतच आर्थिक समस्यांही येत नाहीत. दरम्यान, शास्त्रात अशा घरांबद्दल सांगितले आहे की जिथे कधीही तुळशीचे रोप लावले नाही पाहिजे.
अशा घरांमध्ये तुळशीचे रोप लावले तर त्याचे फायदे होण्यापेक्षा नुकसानच अधिक होण्याची भीती असते.
मान्यतेनुसार जर एखाद्या घरात मांसाहारी भोजन केले जात असेल तर तेथे कधीही तुळशीचे रोप लावू नये. मान्यतेनुसार तुळस ही भोलेनाथ यांना प्रिय आहे. अशातच तुळशीच्या पुजेसाठी घरात सात्विकता असणे गरजेचे आहे.
जर एखाद्या घरात दारूचे सेवन केले जात असेल तर तेथे कधीही तुळशीचे रोप लावू नये. असे घर नेहमी अशुद्ध असते. यामुळे येथे तुळशीचे रोप लावू नये. तुम्हाला लाभ होण्याऐवजी नुकसानच होईल.