Friday, May 9, 2025

ताज्या घडामोडीश्रध्दा-संस्कृती

आई-वडिलांनी आपल्या मुलांसमोर कधीही ही कामे करू नयेत

आई-वडिलांनी आपल्या मुलांसमोर कधीही ही कामे करू नयेत

मुंबई: आचार्य चाणक्य यांना भारतातील सर्वात मोठे अर्थशास्त्र आणि विद्वान मानले जात अससे. त्यांनी आपल्या नीति शास्त्रात जीवनात यशस्वी होण्यासाठी काही नियम सांगितले आहेत.


चाणक्यने आपल्या नीति शास्त्रात तीन अशा गोष्टी सांगितल्या आहेत. जे आई-वडिलांनी आपल्या मुलांसमोर कधीही करू नयेत.


आचार्य चाणक्य यांच्या मते पालकांनी आपल्या मुलांसमोर विचारपूर्वक बोलले पाहिजे. मुलांसमोर तुमची भाषा आणि बोली तसेच वागणूकही व्यवस्थित असली पाहिजे.


अहंकार, द्वेष, क्रोध, अपमान अथवा शिवीगाळ मुलांसमोर चुकूनही करू नये. यामुळे मुलांवर वाईट संस्कार होतात. तसेच ते चांगला माणूस बनणार नाहीत.


आईवडिलांनी मुलांसमोर कधीही एकमेकांचा अपमान करू नये. यामुळे मुलांचे पालनपोषण, संस्कार आणि व्यवहार यांच्यावर वाईट परिणाम होतो.


आई-वडिलांनी आपल्या मुलांसमोर कधीही खोटे बोलू नये. असे केल्याने आई-वडिल मुलांच्या नजरेत आपला सन्मान गमावतात.


जर मुले खोटे बोलत असतील तर त्याला चांगले संस्कार देणे कठीण होते.


आई-वडिलांनी मुलांसमोर कधीही चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन देऊ नये. त्यांना सुरूवातीपासूनच योग्य आणि अयोग्य यातील फरक समजावला पाहिजे.

Comments
Add Comment