मेश्वर कन्स्ट्रक्शनची दहीहंडी "आई डे केअर" च्या गतिमंद मुलांनी फोडली

  63

पेण(देवा पेरवी)- आज संपूर्ण देशभरामध्ये दहीहंडीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. पण शारीरीक कमतरतेमुळे गतीमंद आणि अपंग मुलांना हा आनंद घेता येत नव्हता. मात्र उद्योजक राजू पिचिका यांच्या पेणमधील “रामेश्वर कन्ट्रक्शन" ने अनोखा उपक्रम राबवत गतीमंद मुलांच्या दहीहंडीचे आयोजन केले होते.


या दहीहंडी उत्सवामध्ये 55 गतीमंद मुलांनी सहभाग घेत हंडी फोडण्याचा आनंद लुटला. ही विशेष मुलं पाण्याच्या फवाऱ्यात व आनंदात चिंब भिजली होती, यावेळी निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. गतिमंद मुलांना वेगवेगळ्या कार्यक्रमातून उभारी देण्याचे काम "आई डे केअर' संस्था करत असून गेल्या 14 वर्षांपासून रामेश्वर कन्ट्रक्शनचे सर्वेसर्वा राजू पिचिका यांनी आमच्या मुलांना दहीहंडी फोडण्याचा मान दिल्याने खूप आनंद होत असल्याचे संस्थेच्या स्वाती मोहिते यांनी व्यक्त केले.


रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे मालक राजू पीचीका यांच्या मार्फत हा अनोखा उपक्रम राबविण्याचे हे चौदावे वर्ष आहे. या कार्यक्रमानंतर सर्व मतिमंद मुलांना पेण उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, उद्योजक राजू पिचिका, सुषमा अनिरुद्ध पाटील, धर्मेश पोटे आदी मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व खाऊ देण्यात आला.

Comments
Add Comment

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या

‘महादेवी हत्तिणी’च्या ‘नांदणी’वापसीचा मार्ग मोकळा, पण कायद्याचा अडसर

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महादेवी हत्तिणीला जनभावनांचा आदर करत ‘वनतारा’