मुंबई : आज सर्वत्र मोठ्या उत्साहात दहीहंडीचा सण साजरा केला जात आहे. वेगवेगळी गोविंदा पथके जास्तीत जास्त थर लावण्यास सज्ज झाली आहेत. मात्र, याच दहीहंडीच्या उत्सवात काही वेळेस उंच थरांवरुन पडून गोविंदांना दुखापत होण्याची शक्यता असते. या कारणामुळे गेल्या काही वर्षांत गोविंदा जखमी होऊन मरण पावल्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत. अशा दुर्घटना होऊ नयेत याकरता एक हेल्पलाऊन क्रमांक देण्यात आला आहे. जखमी गोविंदांसाठी या क्रमांकावर संपर्क साधल्यास तात्काळ वैद्यकीय मदत मिळणार आहे.
डोंबिवलीतील एम्स रुग्णालयाने जखमी गोविंदांसाठी इमर्जेंसी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. यासाठी कोणत्याही गोविंदाला ऑर्थोपेडिक किंवा मेंदूला दुखापत झाल्यास तात्काळ वैद्यकीय मदत आणि रुग्णवाहिका सेवासाठी आपत्कालीन हेल्पलाइन नंबर 7506274959 वर कॉल करण्याचे आवाहन एम्सने केले आहे.
मुंबई आणि ठाणे परिसरात प्रसिद्ध असलेल्या दहीहंड्यांना काही वेळापूर्वी सुरुवात झाली असून, मुंबईकरांमध्ये याबाबत मोठा उत्साह दिसून येत आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आज मुंबई परिसरातील विविध दहीहंड्यांना उपस्थित राहणार आहेत. तर भाजपने ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात कमळ दहीहंडीचे आयोजन केले आहे. दरम्यान भांडुपमध्ये मनसेने आयोजित केलेल्या दहीहंडीत जय जवान पथकाने नऊ थरांची सलामी दिली आहे. मनसेचे मोहन चिरात यांनी या दहीहंडीचे आयोजन केले आहे.
कल्याण : वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने (KDMC) कल्याणमधील सहजानंद चौकात सौरऊर्जेवर चालणारा…
मुंबई : सध्या बाहेर कुठेही बाहेर पडायचं झालं तरी चेहरा, अंग झाकेल असे कपडे घालूनच…
मुंबई : कधी मराठी - अमराठी तर कधी भूमिपुत्रांचे हक्क तर कधी उद्धव - राज…
जम्मू-काश्मीरसह उत्तर भारत हादरले काबूल : अफगाणिस्तान-ताजीकिस्तान सीमावर्ती भागात शनिवारी (दि. १९) भूकंपाचे तीव्र धक्के…
कोलकाता : वक्फ दुरुस्ती विधेयकावरून पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर भाजप नेते आणि सुप्रसिद्धी अभिनेता मिथुन…
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…