नांदेड : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण (Vasantrao Chavan) यांचे काल सकाळी अल्प आजाराने निधन झाले. आज नांदेडमध्ये त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी वसंतराव चव्हाण यांचे मित्र, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री डी. पी. सावंत हे देखील या प्रसंगी उपस्थित होते.
आज त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत तसेच भाजपाचे नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह नांदेडचे स्थानिक नेते, काँग्रेस कार्यकर्ते आणि चव्हाण यांचे समर्थक उपस्थित होते.
श्वास घेण्यास त्रास होत असल्याने हैदराबादमधील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…