देखभाल करणारे इंजिन बंद पडल्याने कोकण रेल्वे दोन तास ठप्प

  61

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या सावर्डे ते आरवली दरम्यानच्या मार्गावर रेल्वेमार्गाची देखभाल करणारे इंजिन बंद पडल्याने आज सकाळी कोकण रेल्वेची वाहतूक सुमारे दोन तास बंद पडली.


वाहतूक बंद राहिल्याने गोव्याच्या दिशेने धावणाऱ्या मुंबई सीएसएमटी ते मडगाव वंदे भारत आणि जनशताब्दी एक्स्प्रेस गाड्या थांबवून ठेवाव्या लागल्या. आज सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला.


कोकण रेल्वेच्या सावर्डे ते आरवली या मार्गावर देखभालीसाठी फिरणारे सीएमएस मशीन अचानक बंद पडले. त्यामुळे याचदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस तसेच मुंबईच्या दिशेने धावणारी कोचुवेली-एलटीटी गरीब रथ एक्स्प्रेस या गाडीसह अन्य काही गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या. त्यामुळे विविध स्थानकांवर थांबून ठेवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये प्रवाशांना ताटकळत बसावे लागले.


या घटनेमुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर वाहतुकीला निर्माण झालेला अडथळा दूर करण्यात सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास यश आले. त्यानंतर विस्कळीत झालेली वाहतूक पूर्वपदावर आली.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण